Mumbai : जेजुरीतील मार्तंड देवस्थान समितीवर स्थानिकांना डावलून सत्ताधाऱ्यांकडून बाहेरच्या लोकांची नेमणूक केली आहे. जेजुरीतील स्थानिकांना डावलल्याने ग्रामस्थ गेल्या दहा दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारला काही केल्या घाम फुटनेसा झालेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या निर्णयात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. (Villagers of Jejuri meet Raj Thackeray regarding issue of Martand Devsthan trustee)
जेजुरीच्या (Jejuri) खंडोबा गडाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळामध्ये स्थानिकांना डावलून सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना संधी दिली आहे. या विश्वस्त मंडळातील तिघे वगळता इतर चौघे हे पुरंदर (Purandhar) तालुक्याबाहेरील आहेत. सत्ताधारी पक्षाचा हा डाव गावकऱ्यांच्या वर्मी लागला असून या विश्वस्तांच्या विरोधात त्यांनी गेल्या दहा दिवसांपासून आंदोलनास्त्र उगारले आहे. जेजुरीकर या निर्णयाच्या विरोधात विविध आंदोलन, राजकीय नेते आणि न्यायालयाच्या माध्यमातून दाद मागत आहेत. मात्र, सरकारमधील पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी जेजुरीकरांच्या आंदोलनाकडे सोईस्कररित्या विसरलेले दिसत आहेत.
भेटीनंतर जेजुरीकर शिष्टमंडळ म्हणाले की, स्थानिक खांदेकरी, मानकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवास स्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांनी आम्हाला आशादायक असं आश्वासन दिलं आहे. संबंधित विभाग, महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून स्थानिका न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. (Martand Devsthan Trustee)
राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्राची भूमिका मांडत असतात. त्यामुळे आम्हा जेजुरीकरांना एकच आशा उरली होती, ती म्हणजे राज ठाकरे. ते लवकरच आम्हाला न्या मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाकडे चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावतील, अशी आम्हाला खात्री आहे, अशी शिष्टमंडळाने सांगितले.
ते म्हणाले की, धर्मकारणात राजकारण येऊ नये, अशी जेजुरीकरांसह संपूर्ण भाविकांची भावना आहे. त्यामुळे तेथील खांदेकरी, मानकरी असतील, जे आपत्कालीन वेळेला लवकरात लवकर मंदिरात पोचतील, अशा जास्तीत जास्त विश्वस्तांची नेमणूक व्हावी, यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच आम्ही जाऊ इच्छितो.
स्थानिक भूमिपुत्रांचं गाऱ्हाणं आम्ही त्यांच्यासमोर मांडलं. त्यानंतर ते म्हणाले की, सहधर्मदाय आयुक्तांकडून त्यांचं म्हणणं मागून घेतो. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतो आणि निश्चितपणे या प्रश्नी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन राज ठाकरे यांनी आम्हाला दिले आहे, असे जेजुरीच्या ग्रामस्थांनी सांगितले.
हा लढा सर्वपक्षीय आहे. स्थानिक आमदार संजय जगताप, खासदार सुप्रिया सुळे आमच्याबरोबर आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हेही आमच्यासोबत आहेत. मात्र, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे यामध्ये आणखी चार विश्वस्तांची वाढ करता येईल का, यासंदर्भात राज ठाकरे हे चौकशी करून आमच्याशी बोलणार आहेत. हा सर्वपक्षीय लढा आहे. हा कुठल्याही एका पक्षाचा लढा नाही, असेही जेजुरीकर ग्रामस्थांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.