BJP Leader Advice to Aaditya : भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने आदित्य ठाकरेंना दिला हा महत्वाचा सल्ला...

एक ठराविक मीडिया पर्सन म्हणून बरं वाटतं. पण, प्रत्यक्षात ग्राउंडला आपल्याला स्वीकारले पाहिजे
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी युवा सेनेचे प्रमुख तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. आदित्य यांनी फक्त मीडिया पर्सन बनून राहू नये. त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात संपर्क वाढविला पाहिजे. त्यांनी टीव्हीवर, पेपरमध्ये कमी दिसणं आणि लोकांमध्ये जास्त राहणं गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. (BJP national leader gave this important advice to Aditya Thackeray....)

माजी मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawade) हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी युतीचा तुटण्याचा आणि आदित्य ठाकरे यांच्या संबंधाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यामुळे भाजप शिवसेनेची युती तुटली, असं काही नाही. कोणी आग्रह धरला आणि पक्षनेत्यांनी ऐकलं असं होत नसतं. पक्षाच्या पातळीवर एकत्रित विचार झालेला असतो.

Aditya Thackeray
Dhananjay Munde Advice Pankaja : पंकजाताई, कुठं काय बोलावं अन्‌ त्या बोलण्यानं आपलं नुकसान होणार नाही, याची काळजी घे; धनंजय मुंडे यांचा सल्ला

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात संपर्क वाढविला पाहिजे. एक ठराविक मीडिया पर्सन म्हणून बरं वाटतं. टूलकीटवाल्या एन्व्हार्यन्मेंटलिस्टचा नेता होणे खूप सोपे असतं. तेवढ्यापुरतंच आपण असतो. पण, प्रत्यक्षात ग्राउंडला आपल्याला स्वीकारले पाहिजे, असे वाटत असेल तर टीव्ही, पेपरमध्ये कमी दिसणं आणि लोकांमध्ये जास्त दिसणं महत्वाचं आहे. यातून तुम्ही लोकांच्या मनात जास्त जाता. आदित्य यांनी ते करण्याची गरज आहे, असेही तावडे यांनी सूचविले.

Aditya Thackeray
Dhananjay Munde News : मी रात्रभर झोपलो नाही; कारण, गोपीनाथ मुंडेंचे फोटो... : धनंजय मुंडेंकडून आठवणींना उजाळा

तावडे म्हणाले की, मला वाटतं की, आदित्य ठाकरे यांचं वयचं एवढं कमी आहे की त्यांच्यात हा ग्रामीण जनसंपर्काचा गुण हळूहळू डेव्हलपही होईन जाईल. ज्या प्रमाणे राहुल गांधी यांनी प्रयत्न केला आहे, तसाच प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी करावा. मला वाटतं की तरुण लीडरशीप ही कोणत्याही पक्षाची असू द्या. ती उभी राहिली पाहिजेच.

Aditya Thackeray
Ajitdada Vs Sanjay Raut : धरणात XXXपेक्षा थुंकणं चांगलं; ज्याचं जळतं, त्याला कळतं; संजय राऊतांचा अजितदादांवर पलटवार

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. त्यांना तरुणाईकडून प्रतिसादही मिळत आहे. त्यावर विनोद तावडे म्हणाले की, राजकारण हे इव्हेंटमुळे होत नाहीत. सभा करून होत नाही. चांगल्या सभांबरोबर बाकीची चांगली जोडणीही लागते. सभा केल्यानंतर तेथील लोकांशी चर्चा करून विकासाचे विषय हाती घेतले पाहिजे. पण, हे सर्व आदित्य ठाकरे शिकतील. सगळ्या पक्षातील तरुण नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षातील तरुण नेते वाढले पाहिजेत, असेही विनोद तावडे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com