Vinay Natu Vs Bhaskar Jadhav : पटाईतला नौटंकीबाज आहे, विनय नातू कोणाला म्हणाले...

Vinay Natu criticism of Bhaskar Jadhav : भाजपचे खेड येथे झालेल्या तालुकास्तरीय अधिवेशनात माजी आमदार विनय नातू आणि जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर तिखट शब्दात टीका केली.
Vinay Natu Vs Bhaskar Jadhav
Vinay Natu Vs Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव गुहागर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करत असतानाच, माजी आमदार विनय नातू यांनी टीकेचा टायमिंग साधला आहे. पटाईतला नौटंकीबाज, अशी शेलक्या शब्दातली टीका विनय नातू यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली आहे.

भाजपचे तालुकास्तरीय आंदोलनात माजी आमदार विनय नातू आणि जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवली. गुहागरचे गेली 15 वर्षे प्रतिनिधीत्व करताना विकासात असमतोल दिसतो. मोजक्याच वाड्या-वस्त्यांवर, गावांत विकास झाला आहे. तरी देखील शोधून देखील विकास सापडत नाही, अशी जोरदार टीका भाजपने या अधिवेशनात केली.

Vinay Natu Vs Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : आमदार जाधवांचा वेगळाच राजकीय मूड, पुत्रप्रेमाखातर घेणार मोठा निर्णय

माजी आमदार विनय नातू यांनी आमदार भास्कर जाधव हे नौटंकी करण्यात तरबेज आहेत. पटाईत आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह सगळ्यांची नक्कल चांगली करतात. तसा त्यांचा हातखंडा आहे. प्रसिद्धी माध्यमांसमोर जावून नक्कल करण्यापलीकडे भास्कर जाधव यांनी काहीच केले नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेत्यांनी राज्यात आणि देशात केलेल्या विकासाची तुलना कोणीच करू शकत नाही, असेदेखील विनय नातू यांनी म्हटले.

Vinay Natu Vs Bhaskar Jadhav
Uday Samant : मंत्री उदय सामंत म्हणाले, '46 हजार कोटीवर किती शून्य हेच मला...'

भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी देखील आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. भास्कर जाधव यांनी फक्त स्वतःचा फायदा पाहिली. पक्षांतर देखील त्यातून करत असतात. शिवसेना ते राष्ट्रवादी आणि नंतर राष्ट्रवादी ते शिवसेना, असा त्यांचा प्रवास आहे. गुहागरच्या विकासासाठी महायुतीचा आमदार करण्याचा निर्धार सर्वांनी करावा, असे आवाहन केदार साठे यांनी या अधिवेशनात केले. महिला मोर्चा उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विनोद चाळके, तालुकाप्रमुख किशोर आंब्रे, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com