एकनाथ शिंदेंना आमदार केलं, हे माझ्या आयुष्यातील मोठं पाप ; राऊतांना पश्चाताप

मी जर त्यांचे नाव बाळासाहेबांना सूचवलं नसतं तर शिंदेंना आमदारकी मिळाली असती का ?
Eknath Shinde News, Vinayak Raut News
Eknath Shinde News, Vinayak Raut Newssarkarnama
Published on
Updated on

रत्नागिरी : शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत (vinayak raut)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची खिल्ली उडवली आहे. त्यांच्या बौद्धीक क्षमतेबाबत राऊतांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. "माझ्यामुळे शिंदेंना आमदारकी मिळाली," असे म्हणत त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. राऊत हे माध्यमांशी बोलत होते. (Vinayak Raut latest news)

एकनाथ शिंदेंना ठाणे विधानसभेची उमेदवारी कशी मिळाली, याबाबत विनायक राऊत यांनी जुना किस्सा पत्रकारांना सांगितला. विनायक राऊत म्हणाले, "मी जर त्यांचे नाव बाळासाहेबांना सूचवलं नसतं तर एकनाथ शिंदेंना आमदारकी मिळाली असती का, हे त्यांनी त्यांच्या आई-वडीलांची शपथ घेऊन सांगावं,"(Eknath Shinde News in Marathi)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रिक्षाच्या स्पीडपेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, असे त्यांनी लिहिल्याचे खासदार विनायक राऊत यांना माध्यमांनी सांगितलं. त्यावर राऊत म्हणाले "एकनाथ शिंदे यांची विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ते टि्वट करतात. ते स्वतः कधी टि्वट करतात का, त्यांना टि्वट तरी लिहिता येते का, याचा अभ्यास करावा लागेल,"

"मी ज्यावेळी ठाणे शहराचा संपर्कप्रमुख होतो, तेव्हा एकनाथ शिंदे हे सभागृहाचे गटनेते होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांनी तेव्हा तत्कालीन शिवसेना नेते सतीश प्रधान यांना गुलाल लावून एबी फार्म दिला होता. पण मी मध्यस्थी केली, बाळासाहेबांना सांगितले की, सतीश प्रधानांना राज्यसभा खासदार करा, विधानपरिषदेची आमदारकी द्या. एकनाथ शिंदे तरुण आहेत, त्यांना ठाणे विधानसभेची उमेदवारी दिली, तर ती भविष्य़ात उपयोगी ठरेल, पण आज पश्चाताप होतोयं, ते माझ्या आयुष्यातील मोठं पाप होतं,"

Eknath Shinde News, Vinayak Raut News
ठाकरे सरकार निर्णय घेण्यास अपयशी : दाऊद, बॉम्बस्फोट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा घणाघात

"संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार होती तर तुम्ही केव्हाही मुख्यमंत्री यांच्याकडे बोलायला पाहिजे होतं. केलेल्या गद्दारीचं खापर शंभूराज देसाई (shambhuraj desai) हे कोणावर तरी फोडायचं होत म्हणून असे आरोप करायचे हे चुकीचे आहे," असेही राऊत यांनी नमूद केले. आता तुम्हांला अक्कल दाढ फुटतेयं त्यावेळी का गेला नाही उद्धव ठाकरेंकडे असा सवाल राऊतांनी यावेळी केला.

"राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा," असे पत्र राहूल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलं आहे. यावर खासदार राऊत म्हणाले, "लेखी पत्र देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनही सांगता आलं असतं. त्यांचे दरवाजे उघडे होते,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com