ठाकरे सरकार निर्णय घेण्यास अपयशी : दाऊद, बॉम्बस्फोट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा घणाघात

आमच्याकडे बहुमत आहे. न्यायालयात आमच्या विरोधात गेलेल्या लोकांनाही न्यायालयाने फटकारले आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधण्यास सुरवात केली आहे. उद्धव ठाकरे निर्णय घेण्यास अपयशी ठरले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. शिंदे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Eknath Shinde news update)

हिंदुत्व, मुंबई बॉम्बस्फोट, दाऊद इब्राहिम आदी विषयावरुन शिंदेंनी ठाकरेंवर तोफ डागली. "आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम करत नाही. लोकशाहीत कायदे आणि नियम असतात, त्यानुसार काम करावे लागते," असे सरकार स्थापनेबाबत शिंदे म्हणाले.

"जेव्हा-जेव्हा हिंदुत्व, दाऊद इब्राहिम, मुंबई बॉम्बस्फोट, असे अनेक मुद्दे समोर आले तेव्हा महाविकास आघाडी (MVA) सरकार निर्णय घेण्यास अपयशी ठरले. सरकारच्या लोकांना कोणताही निर्णय घेता आला नाही," असा गंभीर आरोप शिंदेंनी केला. "दाऊद इब्राहिमशी संबंधित मुद्दे पुढे आले, मुंबईत दंगली झाल्या, पण माविआ सरकार निर्णय घेण्यात अपयशी ठरले, असे शिंदे म्हणाले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shivsena: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच खिंडार ; दोन शाखाप्रमुखांचा राजीनामा

"शिवसेना-भाजप (Shivsena - BJP) एकत्र निवडणुका लढले, मात्र शिवसेनेने काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकार स्थापन केले. आज आपल्याकडे बहुमत आहे. सर्वोच्च न्यायालयात आमच्या विरोधात गेलेल्या लोकांनाही न्यायालयाने फटकारले आहे," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

"देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाने उपमुख्यमंत्री झाले, पण पक्षाचा आदेश आला की ते पक्षाचा आदेश पाळतात. त्यांनी माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदावर बसवले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानतो," असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..

  1. आम्ही निवडणूक जिंकतो तेव्हा आमच्या मतदारसंघातील मतदारांना विकासाच्या अपेक्षा असतात, पण आमचे आमदार काम करू शकले नाहीत आणि निधीची कमतरता होती. याबाबत वरिष्ठांशी बोलूनही यश मिळाले नाही. त्यामुळेच आमच्या 40-50 आमदारांनी ही भूमिका घेतली.

  2. आम्ही महाविकास आघाडीत बसलो आहोत, त्याचा फायदा नाही, तोटा आहे, अशी चर्चा मी अनेकदा केली आहे. उद्या निवडणूक कशी लढवायची या चिंतेत आमचे आमदार आहेत. नगर पंचायत निवडणुकीत आम्ही चौथ्या क्रमांकावर गेलो. सरकारचा शिवसेनेला फायदा होत नव्हता.

  3. बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरची भूमिका, हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा निर्णय घेतला. आमच्या जवळपास 50 आमदारांनी एकाच वेळी अशी भूमिका घेतली तर यामागे मोठे कारण असेल, याचा विचार व्हायला हवा होता.

  4. भाजप सत्तेसाठी काहीही करते, असे लोकांना वाटले होते, परंतु या 50 लोकांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्याचे त्यांनी सर्व देशवासीयांना सांगितले आहे. त्यांचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे, विकासाचा आहे, त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com