ShivsenaUBT Politics : उद्धव ठाकरे 'ऑपरेशन टायगर'विरुद्ध अ‍ॅक्शन मोडवर; पक्षविरोधात कारवायांवरून तिघांची हकालपट्टी

Vinayak Raut Ratnagiri ShivSenaUBT party Uddhav Thackeray : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या रत्नागिरीमधील पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधी कारवाई केल्याने तिघांची हकालपट्टी केली आहे.
Uddhav Thackeray 1
Uddhav Thackeray 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यात 'ऑपरेशन टायगर' सुरू आहे. शिंदेंच्या या 'ऑपरेशन'ची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने दुर्लक्ष करण्याचे ठरवले असून, हवा काढून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याने रत्नागिरीमधील तिघा पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी तसे आदेश काढले असून, 'ऑपरेशन टायगर'ची खिल्ली उडवताना हे 'ऑपरेशन कोल्हा' आहे, असा टोला लगावला आहे.

'ऑपरेशन टायगर' टागरची हवा काढून घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) सेना पक्ष देखील अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या रत्नागिरी दौऱ्याचे टायमिंग साधून पक्षविरोधी कारवाई केल्याने तिघांची हकालपट्टी केली आहे. जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि विधानसभा प्रमुख रोहन बने या तिघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली.

Uddhav Thackeray 1
Uday Samant And Vinayak Raut : उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, शिंदेंना भाजपने पर्याय शोधलाय; विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शिंदे यांच्या या दौऱ्यात शिवसेना (Shivsena) ठाकरे पक्षातील पदाधिकारी प्रवेश करणार आहेत. शिंदेंची यावेळी सभा होणार आहे. त्याची देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी करण्याचा चंगच नेते मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray 1
Shivsena Politics : खासदार लंकेंची देखील शिंदेंच्या खासदाराच्या घरी स्नेहभोजनाला हजेरी; ठाकरेंचा शिलेदार म्हणतोय, वावगे काय?

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून हकालपट्टी होताच, विलास चाळके आणि राजेंद्र महाडिक यांनी लगेचच, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज लगेचच पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तशी तयारी देखील करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास अनेक नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील नेत्यांची संख्या मोठी आहे. एकनाथ शिंदेंच्या आजच्या रत्नागिरी दौऱ्यात दोन माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी प्रवेश करणार आहे. तसेच संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे माजी आमदार गणपत कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना वाढावी, यासाठी मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी करण्याचे नियोजन उदय सामंत यांनी हाती घेतले आहे. राज्यातील अनेक शाखाप्रमुख, विभागप्रमुख शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उदय सामंत 'फिल्डिंग' लावत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com