Manoj Jarange Patil Sabha : 'जरांगेंच्या सभेला हिंसक वळण देण्याचा डाव होता'; ठाकरे गटातील नेत्याचा गंभीर आरोप

Vinayak Raut On Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे पाटील यांच्या सभेवरून ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत गेल्या आठवड्यात मोठी सभा झाली. या सभेला लाखोंची उपस्थिती होती. ही सभा शांततेत पार पडली, पण आता या सभेबाबत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे.

Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil News : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार; दहिवडीत जाहीर सभा

अंतरवाली सराटीत गेल्या शनिवारी झालेल्या सभेला राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाज आला होता. या सभेला एवढी प्रचंड गर्दी होती, की महामार्गावर कित्येक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे अनेकांना सभेपर्यंत पोहोचताच आले नाही. अनेकांनी महामार्गावरच मोबाईलवरून जरांगेंची सभा पाहिली.

काय म्हणाले विनायक राऊत?

'जरांगेंच्या सभेतील तुफान गर्दीवरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते विनायक राऊत धक्कादायक दावा केल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. 'अंतरवाली सराटीतील जरांगेंच्या सभेला हिंसक वळण लावण्याचा सरकारचा डाव होता', असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

'सभेला हिंसक वळण लावण्याचं षडयंत्र सुरू होतं. कारण मनोज जरांगेसारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या हाकेपोटी महाराष्ट्रातून ४० लाख मराठा बांधव जालन्यातील त्या १०० एकर जागेवर एकत्र आले होते. आणि या सभेला हिंसक वळण लागावं, अशी इच्छा असणारे बरेच जण राज्य सरकारमध्ये बसले होते, पण त्यांचा हा जो डाव होता तो फसला. आणि मराठा समाजाने नेहमीप्रमाणे शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवली', असे विनायक राऊत म्हणाले.

PM मोदी आणि अमित शाहांनी लक्ष घालावं - जरांगे पाटील

सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. मराठ्यांचा कित्येक वर्षांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावं. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरित तोडगा काढावा, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

Manoj Jarange Patil News
Maratha Reservation News : आरक्षणाचे स्वप्न घेऊन परतणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ; कुटुंबाची जबाबदारी समाज घेणार..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com