Manoj Jarange Patil News : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार; दहिवडीत जाहीर सभा

Maratha Reservation मराठा समाज अंतरवाली सराटीत एकवटला असून, सरकारला आरक्षणाबाबत दहा दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील दौर्‍याला सुरुवात केली.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

-रूपेश कदम

Maan Manoj Jarange Patil News : उभ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या, जगाने दखल घ्यावी, अशी न भूतो न भविष्यती सभा घेतलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तोफ माणमध्ये धडाडणार आहे. दहिवडी येथे शुक्रवार (२० ऑक्टोबर) रात्री आठ वाजता होणाऱ्या जाहीर सभेची तयारी सुरू झाली आहे. या सभेस सातारा, सांगली, सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे. या नावाचे वादळ संपूर्ण महाराष्ट्रात Maharashtra घोंघावत आहे. या एका सर्वसामान्य माणसाने दिलेल्या हाकेला साद देऊन संपूर्ण मराठा समाज अंतरवाली सराटीत एकवटला होता.

या सभेत त्यांनी सरकारला आरक्षणाबाबत इशारा देऊन दहा दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील दौर्‍याला सुरुवात केली. सातारा जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील येणार हे निश्चित होते, पण सभेचे ठिकाण अंतिम होत नव्हते. मात्र, अंतिम क्षणी माणकरांनी त्यांच्या सभेचा मान पटकावला.

मराठा समाजातील सर्वसामान्य तरुणांनी तालुक्यातील मराठा समाजाच्या गावांना सोबत घेऊन सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन माणमध्ये सभेसाठी येण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन ते दहिवडीत येणार आहेत.

Manoj Jarange Patil
Satara Politics : मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत आहे का?; सदाभाऊंचा सवाल

माणमध्ये होणारी सभा ही मनोज जरांगे पाटील यांची या दौर्‍यातील शेवटची सभा असणार आहे. त्यानंतर ते गावी जाऊन २४ ऑक्टोबरपासूनच्या संभाव्य उपोषणाची तयारी करणार आहेत. त्यामुळे माणमध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Maharashtra Political news

मराठा आरक्षणासह ते कोणत्या मुद्द्यांना स्पर्श करणार? कोणाला झोडपून काढणार? कोणावर ताशेरे ओढणार? तर कोणाला कानपिचक्या देणार? हे पाहावे लागणार आहे. एक मात्र नक्की माणमधील मराठ्यांच्यात कमालीचा उत्साह संचारला आहे.

Edited By : Umesh Bambare

Manoj Jarange Patil
Maratha Aarakshan : 'मराठा समाजाला चिथावणाऱ्या सदावर्तेंना अटक करा'; मराठा क्रांती मोर्चाचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com