साहेब तुम्ही विजयी व्हावेत! मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील शिंदेंच्या पाठिशी

विनोद पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Eknath Shinde Latest News, Vinod Patil Latest News
Eknath Shinde Latest News, Vinod Patil Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दाही जोरदार गाजला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजात प्रचंड नाराजी पसरली. आता शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी शिंदे यांना सत्तेत येण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Eknath Shinde Latest Marathi News)

सध्या सत्ता टिकवण्यासाठी आघाडीची तर भाजपसोबत जाण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यावरून विनोद पाटील यांनी जोरदार टोलाही लगावला आहे. पक्ष कुठलाही असो, सरकार व आपली खुर्ची वाचवण्यासाठी व मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. प्राणपणाने कोर्टात सुद्धा लढा देतात. मात्र हे करत असताना त्या अगोदर निवडून येण्यासाठी ज्यांची तुम्हाला मदत होते, त्या बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला विसरून जाता, असं पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Eknath Shinde Latest News, Vinod Patil Latest News
श्रीमान केसरकर, आपण यांना ओळखता ना! गुलाबरावांचा व्हिडीओ ट्विट करत राऊतांनी डिवचलं

ज्या तळमळीने खुर्चीसाठी झटता त्याच्या अर्ध तरी मराठा आरक्षणासाठी न्यायालयात कष्ट कराल का? यामध्ये एक मराठा लाख मराठा असणारे एकनाथ शिंदे साहेब विजयी झाले तर आनंदच आहे. साहेब तुम्ही विजयी व्हावेत व मराठा आरक्षणाचा तोडगा आपण काढावा यासाठी शुभेच्छा, अशा शब्दांत पाटील यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहे.

मराठा आरक्षणाचं काय?

न्यायालयातून सरकार आलं, न्यायालयातून सरकार जाईल. परंतु न्यायालयात प्रलंबित मराठा आरक्षणाच काय..? देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांनी पहाटेचा शपथविधी करून सरकार स्थापन केले. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप केला व खुले मतदान घेण्याचा आदेश दिला. परिणामी तीन दिवसात सरकार कोसळलं.. आणि न्यायालयाच्या आदेशाचा फायदा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी झाला. आजही तसच होताना दिसतंय, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde Latest News, Vinod Patil Latest News
आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर! एकनाथ शिंदेंची डरकाळी

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि अजय चौधरी साहेब यांच्या गटनेते नियुक्तीलाही आव्हान देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितलं.

शिंदे यांचा दावा आहे की, उपाध्यक्ष (हंगामी अध्यक्ष) मला अपात्रतेची नोटीस देऊ शकत नाहीत. कारण मी गटनेता आहे, अजय चौधरी यांची निवड अयोग्य असून बहुमत आमच्याकडे आहे. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. शिंदे यांच्या बाजूने जेष्ठ विधीतज्ञ हरीश साळवे साहेब तर शिवसेनेच्या वतीने अभिषेक सिंघवी साहेब हे बाजू मांडणार आहेत, असं पाटील म्हणाले आहेत.

न्यायालयातून आलेलं सरकार न्यायालयातून जाईल

शिंदे यांच्या नावावर गटनेते पदाबाबत शिक्कामोर्तब झालं तर व्हीप काढण्याचा अधिकार त्यांचा असेल. साहजिकच ते महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात असतील. परिणामी न्यायालयातून आलेलं सरकार न्यायलायातून जाईल..अस दिसतंय, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com