Vinod Tawde : मराठी माणूस ठरला देश पातळीवर 'पावरफुल' नेता!

BJP Meeting : राष्ट्रीय अधिवेशनात मोदींसोबत फक्त तावडेंचा फोटो व्हायरल
Narendra Modi & Vinod Tawde
Narendra Modi & Vinod Tawde Sarkarnama
Published on
Updated on

Vinod Tawde : दिल्लीत होत असलेल्या भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात पहिल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पक्षासाठी कसे मौल्यवान आणि राष्ट्रीय पातळीवर कसे पावरफुल नेते आहेत, याचा परिचय पदोपदी आला. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मागच्या खुर्चीवर विनोद तावडे बसले होते. राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या पाठिमागे बसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तावडे यांचा फोटो देशभर व्हायरल झाला आहे. इतक्यावर महाराष्ट्रीयन राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे थांबले नाही तर त्यांनी आत्मविश्वासाने राष्ट्रीय माध्यमांना संबोधित केले. या संबोधनात अतिशय महत्वपूर्ण आणि गुणात्मक मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी मांडला. गेल्या 23 वर्षांपासून विविध संवैधानिक पदावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नसल्याचा दाखला तावडे यांनी जोर देत मांडला. हा दाखला इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये शोधून ही सापडणारा नाही असाच आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पहिल्या दिवशी मीडिया संबोधित करताना विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्यावर ‘फोकस’ केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाचा अचूक वेध पत्रकार परिषदेत घेतला. भाजप मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्यरत विनोद तावडे हे पक्ष संघटनेसाठी किती महत्वाचे आणि मौल्यवान आहेत हे राष्ट्रीय अधिवेशनात अधोरेखित झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi & Vinod Tawde
Rajya Sabha Election: 7 मंत्र्यांचा पत्ता कट करून PM मोदींनी वर्षापूर्वी दिलेला इशारा खरा करून दाखवला

विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत बेधडकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू मांडली. भाजपाच्या शासन काळात लोककल्याणकारी योजनाचा आढावा त्यांनी अतिशय कमी वेळात पत्रकारांना सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 23 वर्षांपासून संवैधानिक पदावर कार्यरत आहेत. असे असताना त्यांच्या ‘क्लिन इमेज’वर तावडे यांनी ‘फोकस ’केला. देशात संवैधानिक पदावरील इतर राजकीय नेत्यांवर विविध आरोप होतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 23 वर्षांच्या कार्यकाळात एकही आरोप झाला नसल्याचा महत्वपूर्ण मुद्दा तावडे यांनी अधोरेखित केला. 2014 आधीचा भारत आणि त्यानंतरचा भारत यामधील बदल देशातील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. मोदी सरकारवर काळात मातृशक्तीचा आशीर्वाद असल्याचे ते म्हणाले. देशातील विकासावर ‘फोकस’ करत तो विकास प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचविणार असल्याचे तावडे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार विरोधक भावनिक मुद्द्यांना या निवडणुकीत प्रचारासाठी वापरतील. पण, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी गरीब कल्याणाचे भाजपचे काम जनतेपर्यंत नेण्याची गरज व्यक्त केली आहे. देशाचा सर्वांगिण विकास, गरीब कल्याण, जागतिक पातळीवर भारताचे वाढलेले महत्व या तीन गोष्टी अधोरेखित करत त्या मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत, असे तावडे यांनी सांगितले. गरीब, युवक, शेतकरी आणि महिला यांच्यासाठी मोदी सरकारचे काम जनतेपर्यंत घेऊन जाण्यात पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता यशस्वी झाल्याचा दाखला विनोद तावडे यांनी दिला. साडेसात लाख गावांपर्यंत भाजप पोहोचली आहे. दहा लाख ‘पोलिंग बूथ’पैकी साडेआठ लाख ‘पोलिंग बूथ’पर्यंत भाजपा कार्यकर्ता पोहचला आहे.

Narendra Modi & Vinod Tawde
Sharad Pawar Petition : नाव आणि चिन्हाबाबत शरद पवारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी!

लोकसभेच्या 161 पराभूत मतदार संघामध्ये केंद्रीय मंत्र्यांचे 430 प्रवास झाले. जवळपास एका मतदारसंघात तीन प्रवास झाल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. 161 पराभूत लोकसभा (Lok Sabha Election) मतदारसंघापैकी अनेक मतदारसंघ भाजप जिंकणार असल्याचा दावा तावडे यांनी केला. महिला बचत गट, एनजीओ संपर्क अभियान पक्षाने राबविला. पुढील 100 दिवस भाजपचे (BJP) नेते, कार्यकर्ते बूथवर ‘टार्गेट’ करत मतदारपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत विकासाचा मुद्दा घेऊन जाण्यात यशस्वी होतील, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांनी मोठी जबाबदारी विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर टाकल्याचा अनुभव सर्वांना आला. संपूर्ण दिवसभरात राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातून केवळ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या प्रमुख भूमिकेची चर्चा राज्य त्याच बरोबर राष्ट्रीयस्तरावर चर्चिली गेली हे विशेष.

Narendra Modi & Vinod Tawde
BJP National Convention : भाजपच्या 'हॅटट्रिक'साठी दिल्लीत 'ब्रेनवाॅश'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com