NCP Political News: निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बहाल केले. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. हा निकालही अजित पवारांच्या बाजूनेच लागला. मूळ राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच असं नार्वेकरांनी जाहीर केलं.
शिवाय, अजित पवार गटाचे सर्व आमदारही पात्र ठरवले आहेत. हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे शरद पवार गटाने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्हासाठी शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवार 19 मार्च रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाचा निर्णय सेटलमेंट करून देण्यात आला आहे', असा गंभीर आरोप खासदार शरद पवार यांनी केला आहे. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या पदाला असलेली प्रतिष्ठा ठेवली नाही, असा हल्लाबोलही शरद पवारांनी केला.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय हा शिवसेनेच्या निर्णयाची पुनरावृत्ती झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली, हे देशाला माहिती आहे. पक्ष अन्य लोकांच्या हातात देणं हा अन्याय करणारा निर्णय आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. आगामी निवडणुकीपूर्वी यावर निर्णय घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे करणार आहोत," असं पवार म्हणाले आहेत.
तर 'अजित पवार(Ajit Pawar) आणि शरद पवारांच्या गटांमधील वाद हा पक्षांतर्गत आहे. त्यामुळे कोणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळेच या आमदारांवर घटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार कारवाई करता येत नाही. त्याचबरोबर अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली असंही म्हणता येत नाही. त्यामुळे पक्षातील सर्व आमदारांना पात्र ठरवण्यात येत आहे,' असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालानंतर जाहीर केल्यानंतर सांगितलं होतं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.