
विरार : फोन करुन 'आयटम आहे'अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला शिवसेनेनं (shivsena)पक्षातून हकालपट्टी केली आहे. जितू खाडे असे त्याचे नाव आहे. त्याने रिक्षाचालक महिलेकडे ही मागणी केली होती. या प्रकारानंतर महिला रिक्षाचालकाने त्याला भररस्त्यात चपलेनं चोप दिला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
पक्ष प्रमुखांच्या आदेशात महिलांचा मानसन्मान करणे व त्यांचा आदर राखणे, हे प्रत्येक शिवसैनिकाचे आद्यकर्तव्य आहे, याचे वेळोवेळी स्मरण करून देण्यात येते. त्यामुळे विरार येथील महिलेसोबत घड़लेली घटना निंदनिय आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पक्षप्रमुखांच्या आदेशात जितू खाड़े याची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी म्हटले आहे. या कारवाईचे पत्रच त्यांनी जारी केले आहे.
मुळात पदाधिकारी नेमताना त्याची पार्श्वभूमी बघितली जात असताना दिवसभर नशेत असणाऱ्या खडे याला विभागप्रमुख म्हणून नेमलेच कसे असा सूर आता सेनेतूनच येऊ लागला आहे. जितू खाड़े हा विरार पूर्व येथील शिवसेना विभाग प्रमुख आहे. जितू खाडे फोन कॉलवरुन सेक्ससाठी महिलांची मागणी करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. याच कारणाने संतप्त महिलेने जितू खाडे याला भररस्त्यात रिक्षामध्ये चपलेनेच चोप दिला होता. या घटनेचा व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या या पदाधिका-याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित आरोपी जितू खाडे हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या त्याचा शोध घेतला जात असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पीडित महिला ही विरार येथे राहते. जितू तिला फोन करुन आयटम आहे का? अशी विचारणा करुन नेहमी त्रास देत होता. त्याचा त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने त्याला रिक्षामध्ये बसलेला असताना चपलेने बडवलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.