Andheri East By-Election : मराठी अस्मिता ऋतुजा लटकेंच्या कामी येणार?

Andheri East By-Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष
Rituja Latke, Murji Patel
Rituja Latke, Murji Patelsarkarnama

Andheri East By-Election: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शुक्रवारी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) व भाजप (BJP), बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

अंधेरी पूर्व मतदारसंघात मुंबई महानगरपालिकेचे ८ प्रभाग आहे. यातील ५ प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते. तर दोन भाजपचे व एक काँग्रेसचा नगरसेवक होता. त्यामुळे या मतदार संघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची चांगली पकड आहे.

Rituja Latke, Murji Patel
'मशाल' नंतर आता 'ढाल-तलवार' ला विरोध ; सचखंड गुरुद्वाराचे निवडणूक आयोगाला पत्र

अंधेरी पूर्व मतदारसंघात १ लाख ५ हजार मराठी, ५८ हजार उत्तर भारतीय, ३८ हजार मुस्लिम, ३३ हजार गुजराती, १९ हजार दाक्षिणात्य व १४ हजार ख्रिश्चन मतदार आहेत. ऋतुजा लटके यांना विजय मिळवण्यासाठी त्यांना एकगठ्ठा मराठी मते आपल्याकडे वळवावी लागणार आहेत. तर पटेल यांना विजयासाठी उत्तर भारतीय, गुजराती यासह काही प्रमाणात मराठी मते आपल्याकडे वळवावी लागणार आहेत.

या निवडणुकीत मुस्लिमांची जवळपास ३३ हजारांच्या आसपास मते आहे. ही मते निर्णायक ठरू शकतात. तसेच दाक्षिणात्य व ख्रिश्चन मतेही महत्त्वाची आहे. लटके व पटेल यांच्याशिवाय या मतदारसंघात चार इतर उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून येथून जवळपास ४५ हजार मते घेतली होती. तर काँग्रेसच्या अमीन कट्टी यांनी २७ हजार मते मिळाली होती. शिवसेनेच्या रमेश लटके यांचा १५ हजार मतांनी विजय झाला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मागील निवडणुकीत पटेल अपक्ष लढून सुद्दा त्यांनी चांगली मते घेतली होती. आता त्यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षही त्यांच्या सोबत आहे. तसचे त्यांनी अनेक दिवसापासून मतदार संघात जनसंपर्क वाढवला आहे.

Rituja Latke, Murji Patel
Nanded : `भारत जोडो` देगलूर मार्गे महाराष्ट्रात, स्वागतासाठी चव्हाणांनी कंबर कसली..

तर ऋतुजा लटके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. मराठी मतांचा टक्का, लटके यांच्या बाबत असलेली सहानुभूती आणि शिवसेनेत पडलेले दोन गट, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा त्यांची जमेची बाजू आहे. राज्यातील सत्तातर आणि शिवसेनेत पडलेले दोन गट यामध्ये ही राज्यातील पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com