'मेलेले कॉंग्रेसवाले उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये घेतल्यानं जिवंत झाले'

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद असल्याचं समोर येत आहे
MLA Ashish Jaiswal
MLA Ashish Jaiswalsarkarnama
Published on
Updated on

नागपूर : ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारमध्ये सहभागी करुन घेतल्याने मेलेले काँग्रेसवाले (Congress) जिवंत झाले, असे खळबळजनक वक्तव्य करत नागपूरचे (Nagpur) शिवसेना (Shivsena) समर्थक आमदार आशिष जैयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांनी आघाडीतील दोन्ही पक्षांवर टिका केली आहे. नागपूरमध्ये जिल्हा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. यामुळे आता महाविकास आघाडीत पुन्हा नव्यानं वाद पेटण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना आशिष जैयस्वाल म्हणाले, हे कॉंग्रेसचे लोकं मेले होते, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. सर्वजण आपापले सुटकेस पॅक करुन दुसऱ्या पक्षात जायला निघाले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना सरकारमध्ये घेतलं, नाहीतर या दोन्ही पक्षांना अशी गळती लागली होती की, कोणी विचारायला तयार नव्हतं.अशा शब्दात आशिष जैयस्वाल यांनी टिका केली आहे. तसेच, शिवसेनेच्या मतदारसंघात तुम्ही इतरांना मतदान करायला सांगता, एका एकाला मी पुरुन उरणार, असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.

MLA Ashish Jaiswal
'गेवराई मतदारसंघावर राष्ट्र्वादीचाच झेंडा फडकणार' जयंत पाटील

आशिष जैयस्वाल हे नागपूरच्या रामटेक येथील शिवसेना समर्थक आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निववणूकीत त्यांनी रामटेक मतदारसंघात अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्य़ाच्या ग्रामीण राजकारणावरील काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र भाजपाने १२ वर्षांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेवर सेनेच्या मदतीने आपली सत्ता प्रस्थापित केली.

२०१४ नंतर राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धडाका तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अनेक योजना राबवल्या. मात्र ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपाला नाकारले. २०१४ मध्ये त्यांच्याकडे सहापैकी पाच जागा भाजपच्या होत्या. मात्र या निवडणूकीच सहापैकी फक्त दोन जागा भाजपच्या वाट्याला आल्या. त्यानंतर २०१९ पासून काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचा एक असे आघाडीचे तीन आमदार आहेत.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणूकांनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकारला स्थापन झालं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद असल्याचं समोर येत आहे, आता आशिष जैयस्वाल यांच्या टीकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com