
Mira Bhayander: एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारीस पठाण यांना आज दहिसर टोल नाक्यावर पोलिसांनी रोखलं. मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तांची भेट घेण्यासाठी ते जात होते. पोलिसांनी रोखल्यानंतर रस्त्यातच दहिसर टोल नाक्यावर त्यांनी ठिय्या मांडला.
मीरा रोड येथील नयानगर भागात २२ जानेवारी रोजी दोन गटांत हाणामारी झाली होती. या घटनेने संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी २० पेक्षा अधिक आरोपींना पोलिसांनी अटकदेखील केली आहे. मात्र, कारवाईमध्ये पोलिस भेदभाव करीत आहेत. मला कुठेही जाण्याचा संविधानिक अधिकार असताना पोलिसांनी रोखले आहे, असे पठाण म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वारीस पठाण येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दहिसर टोल नाक्यावर त्यांना रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या वेळी एमआयएमचे कार्यकर्तेदेखील जमले होते. मात्र, पोलिसांनी तिथून जाण्यास सांगितले.
दीडच्या सुमारास वारीस पठाण दाखल होताच, पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी पठाण यांना थांबवून परत जाण्यास विनंती केली. पठाण यांनी सांगितले की, मला पोलिस आयुक्तांना फक्त लेखी निवेदन द्यायचे आहे. तुमच्या सोबत घेऊन चला असे पठाण म्हणाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यामुळे आपणास जाता येणार नाही, असे गायकवाड यांनी सांगितले.
पोलिसांनी रोखले आणि पठाण यांनी थेट टोल नाक्यावर ठिय्या मांडला. पोलिसांकडून अन्याय होत असून, आम्हाला भेटायला देण्यास विरोध मात्र इतर नेते येऊन वादग्रस्त वक्तव्य करून जातात त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. १० ते १५ मिनिटे रस्त्यावर मांडी घालून बसून त्यांनी आंदोलन केले.अखेर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना दहिसर पोलिस ठाण्यात नेले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.