Amol Kolhe: दोन पवारांमध्ये लढत असल्याने शिरूरची निवडणूक माझ्यासाठी कुरुक्षेत्रातील युद्धासारखीच!

Shirur News: कोल्हेंच्या मागे शरद पवारांनी मोठी ताकद उभी केली आहे.
Shirur Lok Sabha Constituency
Shirur Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Shirur Lok Sabha Constituency: शिरूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात मैदानात कोण उतरणार, याबाबत काही नावे चर्चेत आहेत. शिरूर लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी कुरुक्षेत्रातील युद्धासारखीच होणार असल्याची भावना कोल्हेंनी व्यक्त केली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांच्या विरोधात कोण लढणार, याबाबत चर्चा रंगली आहे. यामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, दिलीप वळसे पाटलांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्यासह अन्य काही नावांची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. कोल्हेंच्या मागे शरद पवारांनी मोठी ताकद उभी केली आहे. अजित पवारांनीही शिरूरची जागा प्रतिष्ठेची केली आहे. "दोन पवारांमध्ये लढत होणार असल्याने ही निवडणूक माझ्यासाठी कुरुक्षेत्रातील युद्धासारखीच होणार," असे खासदार कोल्हे यांनी सांगितले.

Shirur Lok Sabha Constituency
Shirdi Lok Sabha Constituency: मोठी बातमी : खासदार लोखंडेंना भाजपचा शिर्डीतून विरोध

शेतकऱ्यांच्या ताटात सरकारने माती कालवली...

"शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुपवाड्याच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उल्लेख केला. यावर प्रत्येकाचा उर भरून आला. मात्र, नुसती पाकिस्तानकडे तलवार रोखून चालणार नाही, तर पाकिस्तानमधील कांदा उत्पादकांचं भलं होत असताना आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात सरकारने माती कालवण्याचं काम केलं,"असा घणाघात कोल्हे यांनी केला आहे.

आढळरावांना आव्हान...

आढळरावांना मी आज भेटलो. 'म्हाडा'वर त्यांची नियुक्ती झाल्याबाबत शुभेच्छा दिल्या. निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा होत असतात. आढळरावांना लोकसभेसाठी माझ्या शुभेच्छा. लोकशाही आहे, कुणीतरी हरणार कुणी तरी जिंकणारच. त्यांना माझं आव्हान आहे, समोरा-समोर चर्चा करा. माझी 5 वर्षांतील कामगिरी आणि त्यांची 15 वर्षांतील कामगिरी यांचा लेखाजोखा मांडा. 'अभिनेता...,'अभिनेता' म्हणायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांना मी मनामनात पोहाेचवले आहे.

R

Shirur Lok Sabha Constituency
Nitesh Rane: देवरा, चव्हाणांनंतर काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर; राणेंचं सूचक टि्वट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com