वसीम रिझवीच्या पुस्तकामुळे दंगल भडकली..

सिया कम्युनिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M. Narendra Modi) व संरक्षण मंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांच्याकडे तक्रार केली होती.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आंदोलन करणे हा अधिकार आहे परंतु आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल तर, ते योग्य नाही. लोकांनी शांतता बाळगली पाहिजे, असे सांगतानाच हिंसेला जबाबदार असणार्‍या लोकांवर सरकारच्याकडून (State Government) कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली.

Nawab Malik
हिंदूंची दुकाने टारगेट केली जात आहे, शांतता राखणे गरजेचे...

दरम्यान, वसीम रिझवी (Waseem Rizvi) हे देशातील वातावरण बिघडेल असे कुठलेही विधाने अथवा लिखाण करणार नाही, याची दक्षता केंद्रसरकारने (Central Government) घ्यावी, असे आवाहनही मलिक यांनी केले. त्रिपुरा येथे जी हिंसा झाली. रिझवी यांनी जे पुस्तक लिहिले आहे, त्याविरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता. यादरम्यान नांदेड आणि इतर ठिकाणी हिंसा झाली असून या हिंसेची कठोर शब्दात निंदा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Nawab Malik
'आज बाळासाहेब असते तर त्यांनी एक थोबाडीत लगावली असती'

मलिक म्हणाले, आंदोलन व निषेध करणे हा लोकांचा अधिकार आहे परंतु चुकीच्या पध्दतीने आवाहन करणे व त्यावर नियंत्रण नसणे हे योग्य नाही. हिंसा होणार नाही ही जबाबदारी आयोजकांची असते. मात्र, काल (ता.12 नोव्हेंबर) जे घडले ते योग्य नाही. जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. मात्र, लोकांनी शांतता ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

रिझवी हे गेल्या दोन-चार वर्षात या देशातील सलोखा कसा बिघडेल याबाबतची विधाने करत आहेत. पुस्तके लिहित आहेत. भावना दुखावेल असे कृत्य करत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही. नियोजित पद्धतीने देशाचे वातावरण कसे बिघडेल असा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. असा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

रिझवीवर तात्काळ कारवाई करा

रिझवी हे सिया वक्फ बोर्डाचे चेअरमन असताना त्यांनी गैरव्यवहार केला होता. 2016-17 मध्ये युपी (UP Police) पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर सिया कम्युनिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. मात्र, ते प्रकरण कोल्ड स्टोरेज मध्ये सीबीआयने ठेवले आहे आणि रिझवीला वादग्रस्त वक्तव्य करायला मोकळीक देण्यात आल्याने देशातील वातावरण बिघडत आहे. त्यामुळे रिझवीवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com