Nawab Malik Case : मोठी बातमी: नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या; अ‍ॅट्रॉसिटीप्रकरणात पोलिसांना न्यायालयाचा 'मोठा' आदेश

Washim court Sameer Wankhed brother Sanjay Wankhed Mumbai police atrocity case NCP Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणावर न्यायालयाच्या पोलिसांना महत्त्वाचा आदेश केला आहे.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे बंधू संजय वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात तपासाचा अहवाल सादर करण्याचा आदेश वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने केला आहे.

या प्रकरणावर पुढची सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे. तसेच समीर वानखेडे यांच्या बहिणीने नवाब मलिक यांच्याविरोधात बदनामी आणि पाठलाग केल्याच्या तक्रारीचा पोलिसांना तपास करण्याचा आदेश मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA) मंत्री असताना नवाब मलिक, त्यावेळी IAS समीर वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणून कार्यरत होते. समीर वानखेडे यांनी मुंबईत त्यांनी ड्रग्सविरोधात मोहीम उघडली होती. एका कारवाईत, तर अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा अडकला होता. त्यावेळी तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी IAS समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आरोप केले होते.

Nawab Malik
Shivsena Politics : DCM शिंदेच्या शिलेदारांना टीका जिव्हारी लागली; खासदार राऊतांविरोधात थेट लाख रुपयाच्या बक्षिसाची घोषणा केली

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. काही आरोप व्यक्तिगत स्वरुपाचे होते. याप्रकरणी समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांनी न्यायालयात (Court) धाव घेतली होती. ही प्रकरण आता न्यायालयासमोर आलीत. समीर वानखेडे यांचे बंधू संजय वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार केली होती. या तक्रारीवर पोलिसांनी काय कारवाई केली, त्याचा अहवाल मिळावा यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

Nawab Malik
Guardian Minister Appointments : भाजप ठरला मास्टरमाइंड, कसा खेळला गेम? मित्र पक्षांसह विरोधकांवर कंट्रोल

15 फेब्रुवारीला प्रकरणाची सुनावणी

न्यायालयाने संजय वानखेडे यांच्या मागणीची दखल घेत मुंबई पोलिसांना तपासाचा अहवाल सादर करण्याचा आदेश केला आहे. वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने तसे आदेश दिले असून, 15 फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे. संजय वानखेडे यांनी 13 डिसेंबर 2024 ला तपासाचा अहवाल मिळावा, यासाठी न्यायालयाकडे केला होता अर्ज.वाशिम शहर पोलिस ठाण्यात 16 नोव्हेंबर 2022नवाब मलिक यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे.

यास्मिन यांच्या तक्रारीची दखल

दुसरीकडे, समीर वानखेडे यांच्या बहिणी यास्मिन वानखेडे या वकील आहेत. त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. बदनामी आणि पाठलाग केल्याचे तक्रारी म्हटले आहे. या तक्रारीत पोलिसांना तपास करण्याचा आदेश मुंबई दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत.

नवाब मलिक यांना दिलासा...

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना एका प्रकरणात दिलासा मिळाला आहे. पुराव्याअभावी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या प्रकरणात माजी मंत्री मलिक यांच्याविरुद्ध क्लोजर रिपोर्ट दाखल करणार असल्याचे मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com