Shivsena Politics : DCM शिंदेच्या शिलेदारांना टीका जिव्हारी लागली; खासदार राऊतांविरोधात थेट लाख रुपयाच्या बक्षिसाची घोषणा केली

ShivSena Ahilyanagar ShivSenaUBT MP Sanjay Raut DCM Eknath Shinde : खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध केला.
Shivsena Politics
Shivsena PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अहिल्यानगरमधील शिलेदारांच्या ही टीका जिव्हारी लागली.

या टीकेचा निषेध नोंदवताना, खासदार संजय राऊत यांना काळे फासणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा केली. या बक्षिसाच्या घोषणामुळे DCM शिंदे यांच्या शिलेदारांचं हे आंदोलन चर्चेत आलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांना महाकुंभमेळ्यात जाऊन बसायला पाहिजे होतं. नागा साधूंबरोबर. नागा साधूही अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात. नाचतात, अशी टीका केली होती. खासदार राऊत यांच्या या टीकेचे पडसाद आता उमटू लागले आहेत. खासदार राऊत यांच्या या टीकेवर DCM शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Shivsena Politics
Walmik Karad : वाल्मिक 'आका' अन् गँगबरोबरच्या सीसीटीव्हीत दिसला 'तो PSI'; सुरेश धस यांची मोठी मागणी (पाहा VIDEO)

DCM एकनाथ शिंदे यांच्या अहिल्यानगरमधील शिवसेनेचे (Shivsena) शहरप्रमुख सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. खासदार राऊत यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. अहिल्यानगर शहरातील दिल्ली दरवाजा इथं शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

Shivsena Politics
Dhananjay Munde Vs Vijay Wadettiwar : धनंजय मुंडे यांना आणखी एक झटका; वडेट्टीवारांनी साधला निशाणा

शहरप्रमुख सचिन जाधव यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, 'कुंभमेळा हा हिंदू धर्मियांचे आस्थेचे प्रतीक आहे. इथं सर्व जातीभेद विसरून देशातील प्रत्येक माणूस कुंभमेळ्यात सहभागी होतो. खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम खासदार राऊतांनी केले आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध आम्ही करतो', असे सांगितले.

शिवसैनिकांनी केलेल्या निषेध आंदोलनानंतर शिवसेना शहरप्रमुख सचिन जाधव यांनी खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा घोषणा केली. खासदार राऊत यांच्या तोंडाला कोणी काळे फासेल, त्यास एक रुपये बक्षीस दिले जाईल. हे बक्षीस थेट रोख स्वरुपात, असेही सचिन जाधव यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com