
Chhagan Bhujbal on NCP Crisis : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वात भाजप सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता. आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल, ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. कोणी परदेशात आहेत. तर कोणी ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करायचं, पण आम्ही पूर्ण विचार करुनच हे पाऊल टाकलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास केल्यावरच हे पाऊल उचललं आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते मुंबईतील एमईटी संस्थेतून बोलत होते.
राज्यात वर्षभरानंतर महाराष्ट्रात दोन जुलैला राजकीय भूकंप झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीतील नऊ आमदार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाची आज मुंबईत बैठक होत आहे.
तुमच्यासोबत कोण आहे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या दमाने यापुढे वाटचाल करणार, निवडणुका जवळ आल्यातरी नियुक्त्या झाल्या नाहीत. नेमणूकाच झाल्या नाहीत. पक्ष काम कसं करणार, कार्यकर्ते नसतील तर काम कसं करणार, हे सगळं काम थांबलेलं होतं. अजितदादांनी पक्षाची जबाबदारी मागितली.
शरद पवार यांनी राजीनामा दिला, ते कोणालाही माहिती नव्हतं. भाजप बरोबर कसे गेले, जसे शिवसेनेसोबत गेलो तसे भाजपसोबत गेलो. पण आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार भाजपसोबत सत्तेत सामील झाले. मग आम्ही झालो तर काय झालं. आपली विचारधारा जी आहे ती कायम राहिली पाहिजे, तडजोड करणार नाही. तुरुंगातून बाहेर आल्यावरही अनेकांनी आमिष दाखवली पण आम्ही नाही गेलो. साहेबांना वाईट वाटण स्वाभाविक आहे. पण हे का झालं, शरद पवार आमच्यासाठी विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.