NCP Meeting : 'आर. आर. पाटलांनी भाजपला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही बाकी आहे..' ; दहा वर्षांपूर्वीचा Video होतोय व्हायरल

Rashtrawadi Crisis : आर. आर. पाटील यांनी भाजपला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही बाकी आहे,"
Rashtrawadi Crisis
Rashtrawadi Crisis Sarkarnama
Published on
Updated on

Todays Rashtrawadi Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) आज (बुधवारी) सत्वपरीक्षा आहे. आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादीच्या इतिहासात आज पक्षाच्या आज गट पडून (NCP Splits) दोन वेगळ्या बैठका होत आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांना जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार (Sharad Pawar vs. Ajit Pawar) असा सामना पाहायला मिळत आहे. (Latest News On NCP Meeting)

शिवसेनेच्या संघर्षाला एक वर्ष उलटत नाही तोच राष्ट्रवादी कोणाची? यावरुन आता राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.शरद पवार आणि अजित पवार यांनी आपापल्या गटाची वेगवेगळी बैठक बोलावली आहे. शरद पवार यांची बैठक वायबी चव्हाण सेंटर (NCP MLAs Attend Meeting) येथे पार पडत आहेत.

अजित पवार गटाची बैठक वांद्रे येथे एमईटी इन्स्टीट्यूट पार पडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर. आर. पाटील यांच्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार (शरद पवार गट) रोहित पवार यांनी तो व्हिडिओ आपल्या टि्वट हॅडलवरुन पोस्ट केला आहे.

भाजपवर आरोप करणारे राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यावर भाष्य करणारा आर.आर.आबांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहेत. "आर. आर. पाटील यांनी भाजपला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही बाकी आहे," असे म्हणत रोहित पवारांनी तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे.

Rashtrawadi Crisis
NCP Crisis News Live: अजितदादांनी फडकवला राष्ट्रवादीचा झेंडा; बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या आली समोर.

व्हिडिओत आर. आर.पाटील म्हणत आहेत की, भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यानांच भाजपने सन्मानाने भाजपमध्ये सामावून घेतले आहे. अशा या भाजपला मला एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही आजवर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यावर तुम्ही असे कोणते तीर्थ शिंपडले की ते पवित्र झाले?

Rashtrawadi Crisis
Jitendra Awhad Tweet: यशवंतरावांच्या चेल्यासाठी, शरद पवारांसाठी आपल्याला यायचं आहे...!

अजित पवार गटाच्या बैठकीला सुरवात झाली आहे. एमईटीच्या सभागृहात ही बैठक होत आहे. अजित पवारांची बैठकीपूर्वी एमईटीच्या प्रागंणात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भूजबळ, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते. सध्या त्यांच्यासमोर ३१ आमदारा उपस्थित असल्याचे माहिती आहे. (Latest News On NCP Meeting)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर दोन्ही गटाकडून दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटाची बैठक नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बोलावल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com