Ratnagiri: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर विरोधकांनी केलेल्या टिकेवरून आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट इशारा देत वाईट शक्तींचा करेक्ट कार्यक्रम करणार, असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा रोख नेमकी कुणाकडे आहे? याची चर्चा आता रंगली आहे.
सामंत म्हणाले, "भारत जोडो यात्रे'त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खालच्या स्तरावरून टीका केली गेली. पण ज्यांना स्वातंत्र्यवीर कळले नाहीत, त्यांचा इतिहास कधी वाचला नाही त्यांनी सावरकरांचे नाव घेणे निषेधार्थ आहे. रत्नागिरीत सोशल मीडियावरून चांगल्या कामाची बदनामी करत चुकीचे संदेश व्हायरल करणाऱ्या शक्तींचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे नाही, नाहीतर त्या वाढतात", अशा शब्दांत सामंत यांनी थेट इशारा दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात आज सामंत बोलत होते. सामंत म्हणाले, "छत्रपती शिवरायांची पहिली आरती वीर सावरकरांनी लिहिली. हा इतिहास लोक विसरू लागले आहेत. सावरकरांची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा निर्णय मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. दहा महिन्यांपूर्वी राजकीय बदल झाला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकाराने प्रथमच २८ मे सावरकरांची जयंती हा सावरकर गौरव दिन म्हणून साजरा होत आहे", असं ते म्हणाले.
"पण पुढच्या पिढीला सावरकर यांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो आहे. ते करेक्ट करण्याचे काम केलं पाहिजे. मी करेक्ट हा शब्द वापरला कारण देशात सावरकर यांच्या बदनामीची मोहीम आखली जात आहे.
पतितपावन मंदिर संस्था, भागोजीशेठ कीर ट्रस्ट असो आमच्यात कधी तंटा होत नाही. रत्नागिरीकर हे सावरकरांच्या विचाराने प्रेरित आहेत. त्यामुळे देशाबद्दलचे प्रेम व्यक्त होते. हा उत्सव ३६५ दिवस झाला पाहिजे. सावरकरांचा विचार राज्यात पोहचविण्यासाठी मोहीम उघडण्याची गरज आहे", असंही ते यावेळी म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.