Mumbai Political News: आगामी विधानसभा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने देशातील वातावरण ढवळून काढले आहे . ठाकरे गटाने आपल्या मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपच्या निवडणूक तयारीवर टीका केली आहे. महापालिका निवडणुका कधी होणार?, असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
"निवडणूक प्रचारासाठी कोणतीही वेगवान साधने विरोधकांना मिळू नयेत यासाठी सुरु असलेला सत्तेचा गैरप्रकार निषेधार्ह आहे. भाजपकडे व त्यांच्या पाठीराख्याकडे अमर्याद साधनसंपत्ती एकूण खर्च किती झाला ? तर 650 कोटी रुपये आणि दिल्लीतील व्दारका एक्सप्रेसवेच्या ३ किलोमीटर रस्ताचा खर्च ७५० कोटींवर गेल्याचे उघड झाले. जे काम फार तर ७५ कोटींत व्हायला हवे ते ७५० कोटींवर गेले . मग पाचशे कोटींचा हिशेब कोठे गेला ? ते भाजपच्या तिजोरीत गेले की भाजप पुरस्कृत ठेकेदाराच्या खिशात? असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
"2024 असो की २०२३ निवडणुका कधीही घ्या, हुकुमशाहीरुपी हिरण्यकश्यपूच अंत हा ठरलेला आहे.जनता जागी झाली आहे. व कोणत्याही भूलथांपाना बळी पडणार नाही.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी म्हणतात, त्याप्रमाणे भाजपने देशातील सर्व विमाने ,हेलिकॉप्टर्स प्रचारासाठी बुक केली आहे. आम्ही म्हणतो त्यांना हवे ते करु द्या, त्यांनी चांद्रयान ३ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुडंलीतल्या ओढूनताणून आणलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच ओढून-चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे," असे अग्रलेखात म्हटलं आहे.
पालिका निवडूक कधी ?
14 महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार हे आता ब्रह्यदेव तरी सांगू शकेल काय ? हा प्रश्नच आहे. हरण्याचा भीतीने निवडणुकाच घ्याचच्या नाहीत, नवा 'अ-लोकतांत्रिक पायंडा भाजप व त्यांच्या फुटीर महामंडळींनी पाडलेला दिसतो . पण लोकसभा निवडणुका मात्र वेळेच्या आधीच म्हणजे डिसेंबर महिन्यातच घेतल्या जातील, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.