Mumbai News : शिवसेना फुटल्यानंतरही ‘मातोश्री’वरची निष्ठा कायम ठेवणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड घोटळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एकीकडे पडणेकरांवर ही कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे, माजी मंत्री रवींद्र वायकरांचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विशेषत: ठाकरे गटाला एकाच वेळी धक्के बसले. त्यात पेडणेकरांवर कोविड घोटाळ्यात त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत याचीच चर्चा सर्वत्र झाली. (Latest Political News)
कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर होत्या. त्यांच्या कार्यकाळात महापालिकेत आर्थिक घोटाळे झाल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सतत करत होते. यातूनच आर्थिक गुन्हे शाखेने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एकूण चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यात माजी महापौर पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादर व वेदांत इन्फो लिमिटेड यांचा समावेश आहे.
पेडणेकरांवर काय आहेत आरोप ?
कोविड काळात 'डेड बॉडी किट बॅग' हे जास्ती किमतीत विकत घेतले
1300 रुपये किंमत असणारी 'बॉडीबॅग' 6800 ला विकत घेतली
कंत्राटे तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आले
यामधून किशोरी पेडणेकर 'किकबॅक' पैसे मिळाले
२१ जून रोजीच्या 'ईडी'च्या ६८ लाख ६५ हजार रोख सापडले
'ईडी'च्या छाप्यात दीडशे कोटींची स्थावर मालमत्ता सील
१५ कोटी रुपयांच्या ठेवी आणि इतर गुंतवणूकही 'ईडी'ला आढळली
या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संकेत देताच २४ तासांतच पेडणेकरांसह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.