Manisha Kayande
Manisha Kayandesarkarnama

Manisha Kayande : आठ वेळा दिल्लीवारी करून काय मिळालं...

२५ वर्षे शिवसेनेसोबत Shivsena भारतीय जनता पार्टीही BJP महापालिकेत Mahapalika सत्तेत होती. मग, या सगळ्या लोकांची देखील चौकशी लावावी.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील कार्यालय ६०० कोटीचे असल्याचे आम्ही एकतोय. मंत्रीपदासाठी हे तिकडे जाऊ शकतात. तरी देखील त्यांना अशी काहीतरी मंत्रीपदे मिळाली आहेत. पण, मातोश्रीवर एकदा गेल्यावर आणि आठ वेळा दिल्लीला भाजपच्या कार्यालयात गेल्यावर तुम्हाला काय मिळाले, असा प्रश्न शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

मनिषा कायंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सत्ताधारी एकनाथ शिंदे गट व भाजपवर टीकेची झोड उठवली. मुंबई महापालिकेच्या चौकशीवरून त्या म्हणाल्या, मुंबई महापलिकेत जो तथाकथित सत्ताधाऱ्यांच्या अर्थाने जो भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असे समजते. करा चौकशी पण, २५ वर्षे शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टीही महापालिकेत सत्तेत होती.

Manisha Kayande
भास्कर जाधवांनी न मागता सल्ला दिला खरा.. पण एकनाथ शिंदेच्या लक्षात येणार?

मग, या सगळ्या लोकांची देखील चौकशी लावावी. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. केवळ मुंबई महापालिकाच का, नागपूर, पिंपरी चिंचवड महापालिकेतही चौकशी लावा. पिंपरी चिंचवड महापालिकेतील तर स्थायी समिती अध्यक्षाला लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. सत्ताधाऱ्यांनी सर्व महापालिकांची चौकशी लावण्याची हिंमत दाखवणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Manisha Kayande
Video: रिकामंटवळे उद्योग करणं म्हणजे हिंदुत्व नाही - मनीषा कायंदे

मनिषा कायंदे म्हणाल्या, मातोश्रीवर टीका केली की त्यांना मंत्रीपदे मिळतील असे वाटतंय. पण, त्यांच्याबद्दल ५० खोक्यांची चर्चा सध्या सुरू आहे. आज त्यांच्या आमदारांना मतदारसंघातील लोक विचारत आहेत. निधी का मिळत नाही. हिंदुत्वासाठी गुवाहटीला गेले, सुरतला गेले, गोव्याला गेले, हातात काय मिळाले, असा प्रश्न केला.

Manisha Kayande
उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही उद्धव साहेबांना नेहमीच ब्लॅकमेल केलं; सुहास कांदे आक्रमक

त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात त्यांना चांगली खाती होती. आत ती सुद्धा त्यांना मिळाली नाहीत. केवळ स्वतःकडे लक्ष आकर्षिक करून घेण्यासाठी मातोश्रीवर व आदित्य ठाकरेंवर टीका करण्याचे त्यांचे उद्योग सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे कार्यालय केवळ ग्राऊंड फ्लोअरवर होते. ते आता किती मजली झालंय. आम्ही असे ऐकतो की ६०० कोटींचे कार्यालय बांधलय. ते तिकडे जाऊ शकतात. तरी देखील अशी काहीतरी मंत्रीपदे त्यांना मिळाली आहेत. मातोश्रीवर एकदा गेल्यावर आणि आठ वेळा दिल्लीला गेल्यावर तुम्हाला काय मिळाले याचे उत्तर त्यांनी द्यावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com