Sharad Pawar Retirement: वाय.बी चव्हाण सेंटरवर नक्की काय चाललंय? भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Politics| शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते वाय.बी. चव्हाण सेंटरवर पोहचल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.
Chhagan Bhujbal News, Yeola Latest News
Chhagan Bhujbal News, Yeola Latest News Sarkarnama

Chhagan Bhujbal on Sharad Pawar Retirement: यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये समितीची कोणतीही बैठक बोलवली नव्हती. विविध राज्यातले राष्ट्रवादीचे नेतेही त्यांची मनधरणी करायला आले आहेत. पण यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कोणतीही बैठक बोलवण्यात आली नव्हती, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिलं आहे. (What exactly is going on at YB Chavan Centre? Bhujbal made it clear)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आज सकाळी अचानक वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार देशभरातील राष्ट्रवादीचे नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठई पोहचले पण तिथूनच राष्ट्रवादीच्या समितीची बैठक सुरु झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्या सर्व चर्चांवर छगन भुजबळ यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

Chhagan Bhujbal News, Yeola Latest News
Sharad Pawar Resigns As NCP Chief : शरद पवारांनी निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी उपोषण; कार्यकर्ते भावूक..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल घेतलेला निर्णय मागे घ्यावा. यासाठी आम्ही शरद पवार यांची मनधरणी करायला आलो आहोत. आम्ही सगळे मुंबईत आहोत. घरी बसून काय करायचं म्हणून इथे आलो आहोत. जयंत पाटील संध्याकाळपर्यंत पुण्यात येतील, मुंबईबाहेर गेलेले नेते मुंबईत परत आले की समितीची बैठक होईल, असंही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान आज सकाळी मी सकाळी जे काही बोललो ते माझं मत, वैयक्तिक मत होतं. पण आता मी जे काही बोललो तो पक्षाचा निर्णय आहे. असंही भुजबळ यांनी सांगितलं आहे. (Sharad Pawar news)

दरम्यान, शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यापुर्वी आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनीही राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच उडाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com