Mumbai Police Recruitment: पोलीस दलात कंत्राटी भरती; काय आहे कारण ?

Maharashtra Police Bharti: पोलीस दलात तीन हजार कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Police
Mumbai Police Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याच्या गृहखात्याने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याने मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्याच्या गृहखात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ११ महिन्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीचा वाद मिटला नसताच आता राज्य सरकारने आता मुंबई पोलीस दलातही कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक या पदांसाठी चाळीस हजार ६२३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. पण त्यातही दहा हजार पदे रिक्त असल्याने पोलिसांना दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमी पडत आहे.

Mumbai Police
Ajit Pawar CM : पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी शंभूराज देसाईंच्या जिव्हारी; म्हणाले, "बाबांना 'वाण नाही पण..."

राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे मनुष्यबळाची टंचाई भासू लागली आहे. त्यातच दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, रमजान या सणांसाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते.यासाठीच मुंबई पोलिस दलात कंत्राटी भरती करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आग्रह धरला होता.

मुंबई पोलीस दलाचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलिसांची बदली केल्याने तीन ते चार हजार पोलिसांना मुंबईबाहेर जाण्याची संधी मिळाली. यामुळेही मुंबईत पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडले आहे.त्यामुळे पोलीस दलात मोठी मनुष्यबळ कमी पडू लागले.आताही अनेक पोलिसांना मुंबईबाहेर बदली करून घ्यायची आहे . परंतु मुंबईतील मनुष्यबळ कमी असल्याने त्यांना बदल्या दिल्या जात नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

Mumbai Police
Raj Thackeray Meet Avinash Jadhav: राज ठाकरे खास शिलेदाराच्या घरी; अविनाश जाधवांच्या तब्येतीची केली विचारपूस

दरम्यान, राज्य सरकारने जानेवारी २०२१ मध्ये ७०७६ शिपाई आणि ९९४ वाहनचालकांच्या भरतीला मंजूर दिली होती. ही भरतीप्रक्रिया पूर्ण होऊन ते सेवेत दाखल होईपर्यंत किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल. पण तोपर्यंत कंत्राटी पोलिसांची ११ महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com