Neelam Gorhe On Thackeray: ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचं कारण काय होतं? नीलम गोऱ्हेंनी केला मोठा खुलासा

Shivsena News: ठाकरे गटात संवादाचा अभाव, नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टच सांगितलं...
Neelam Gorhe
Neelam Gorhe Sarkarnama
Published on
Updated on

Political News: विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'करत शिंदेंच्या शिवसेनेत 7 जुलैला जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. मात्र, शिवसेनेच्या रणरागिनी अशी ओळख असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी का दिली? याचे कारण समोर आलं नव्हतं. पण आता त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा करत ठाकरे गट सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर चर्चेचे दार बंद झाले होते. लोकांची अपेक्षा होती तेवढा वेळ उद्धव ठाकरे देत नव्हते. त्यामुळे ठाकरे गटात संवादाचा अभाव आहे", असा मोठा खुलासा नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.

Neelam Gorhe
Bharat Gogawale Controversial Statement : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघळला, आमदार गोगावलेंचं अदिती तटकरेंविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाले...

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन मी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला नाही. मात्र, ठाकरे गटामध्ये संवादाचा अभाव आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांना याबाबतचं पत्रही दिलं होतं. जास्तीत सास्त लोकांना त्यांनी भेटावं, याबाबत मी त्यांना सांगितलं होतं", असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

"उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर ते आजारी पडले, तेव्हापासून आमची चर्चेची दार बंद झाले होते. त्यांनाही जास्त त्रास द्यायला नको, त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला", असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

Neelam Gorhe
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचाच बोलबाला; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचे पानिपत

दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आपल्या आमदारकीच्या वेळेस खूप मदत केली असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, सध्या सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी टोकाचं बोलू नये. मात्र, वैचारिक मांडणी करावी, असं मतही यावेळी त्यांनी मांडलं.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com