Bharat Gogawale Controversial Statement : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघळला, आमदार गोगावलेंचं अदिती तटकरेंविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाले...

Raigad District Gurdian Minister Dispute : '' ...तर पालकमंत्रीपदावरुन आम्ही काय वाईट काम करणार आहोत का? ''
Aditi Tatkare, Bharat Gogawale
Aditi Tatkare, Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Raigad : भाजपा -शिवसेना युती सरकार सत्तेत आल्यानंतर रखडलेल्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळाला नव्हता. यावरुन शिंदे गट तसेच भाजपामधील इच्छुक आमदांरांनी देवही पाण्यात ठेवून बसले होते. पण सातत्यानं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्ताराला तारीख पे तारीख देण्यात आली. याचवेळी अजित पवार यांची सत्तेत एन्ट्री झाल्यानं सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला आहे.

आता रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. आता शिंदे गटाचे नेते व पालकमंत्रीपदासाठी आग्रही असलेले भरत गोगावले यांनी आमदार अदिती तटकरेंविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे.

Aditi Tatkare, Bharat Gogawale
Nagpur NCP News : अनिल देशमुख ॲक्टिव्ह मोडवर, संघटना बांधणीला केली सुरुवात; शपथपत्र गोळा करणे सुरू !

शिवसेना आमदार भरत गोगावले(Bharat Gogawale) यांनी बुधवारी (दि.१२) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदाविषयी पुन्हा एकदा भाष्य केलं. गोगावले म्हणाले, रायगडच्या पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांच्याविषयी अधिक चांगलं काम करू. कारण महिला आणि पुरूष यामध्ये थोडासा फरक येतोच ना. आम्हाला गेल्या १५ वर्षांचा आमदारकीचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊ आणि काम करू.

रायगडमधल्या सहाच्या सहा आमदारांची, आम्हा सगळ्यांची एकच मागणी आहे की, रायगडचा पालकमंत्री हा भरतशेठ असला पाहिजे. आमची ही मागणी शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या टोकापर्यंत राहणार असल्याचंही गोगावले यांनी यावेळी सांगितलं.

Aditi Tatkare, Bharat Gogawale
Rajya Sabha Election 2023 : राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा ; गुजरातमधून बाबूभाई देसाई..

'' ...तर आम्ही काय वाईट काम करणार आहोत का? ''

आमदार भरत गोगावले यांना आदिती तटकरे(Aditi Tatkare) यांना पुन्हा एकदा पालकमंत्री संधी द्यायला हवी का असा सवाल करण्यात आला. याला उत्तर देताना गोगावले म्हणाले, अदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असेल तर आम्ही काय वाईट काम करणार आहोत का? आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं काम करू असा दावाही गोगावले यांनी यावेळी केला.

रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून वादाची ठिणगी

राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चा प्रवेश झाल्यानंतर रायगडमधील राजकारण ढवळून निघायला सुरूवात झाली आहे. पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात संघर्षांची पहिली ठिणगी पडली आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यास जिल्ह्यातून विरोध होत आहे. यात शिवसेना आणि भाजपच्या सर्व आमदारांनी अदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास विरोध असल्याची चर्चा आहे.

Aditi Tatkare, Bharat Gogawale
Teacher News : शिंदे-फडणवीस सरकारचा ‘तो’ आदेश बेरोजगारी वाढवणारा !

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. पहिल्याच फटक्यात ज्या नऊ आमदारांनी शपथ घेतली त्यात श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता तटकरे यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्री पद येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रायगडमधील शिवसेना-भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com