Baba Siddique : 'मला गोळ्या लागल्या आहेत आणि....'; गोळीबारानंतर बाबा सिद्दीकींचे शेवटचे शब्द काय होते?

Baba Siddique Shot Dead Case Update : माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अशातच आता बाबा सिद्दीकी यांनी गोळीबारानंतर उच्चारलेले शेवटचे शब्द काय होते याबाबतची माहिती समोर आली आहे.
Baba Siddique Shot Dead
Baba Siddique Shot DeadSarkarnama
Published on
Updated on

Baba Siddique Shot Dead Case Update : माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (NCP) नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली आहे.

तर दुसरीकडे या हत्येचं कनेक्शन पुण्यापासून पंजाबपर्यंत असल्याचंही उघडकीस आलं आहे. या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अशातच आता बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. तेव्हा त्यांनी उच्चारलेले शेवटचे शब्द काय होते याबाबतची माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर मुलगा झिशान सिद्दीकींच्या कार्यालयासमोर गोळाबार झाला त्यावेळी ते आजूबाजूला असणाऱ्या लोकांना म्हणाले होते की, "मला गोळ्या लागल्या आहेत आणि मी आता वाचू शकेन असं मला वाटत नाही." यानंतर उपस्थितांनी त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान यांची चौकशी केली. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, झिशान सिद्दीकी यांनी तपासाबाबतची महत्त्वाची माहिती (Mumbai) पोलिसांना दिली. चौकशीत त्यांनी बाबा सिद्दीकी यांचा कोणाशी वाद सुरू होता याबाबतची माहिती दिली.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी झिशान यांना विचारलं की, गोळीबार झाल्यानंतर बाबा सिद्दीकी काही वेळ जिवंत होते का? त्यांचे कोणाशी वैर होते का? त्यांची कोणाशी वैयक्तिक दुश्मनी होती का? त्यांना कोणी मारलं असेल तुम्हाला कोणावर संशय आहे का? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले.

Baba Siddique Shot Dead
Baba Siddique: उत्तर प्रदेशातील एक प्रथा अन् शूटर शिवकुमावरची झाली सिद्दीकींच्या हत्येसाठी निवड

दरम्यान, पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. त्यानुसार सिद्दीकी यांची हत्या करण्याआधी आरोपी गुरमेल सिंग, शिव कुमार आणि आणखी एक आरोपी घटनास्थळावर 40 मिनिटे आधी आल्याची माहिती समोर आली आहे. गोळ्या झाडल्यानंतर ते वेगवेगळ्या दिशेने पळून गेले.

शिवाय यावेळी त्यांनी ओळख लपवण्यासाठी आपले शर्ट देखील बदलले. यासाठी आरोपींनी सोबत एक्स्ट्रा शर्ट आणल्याती माहिती उघडकीस आली आहे. मुंबई पोलिसांना घटनास्थळार आरोपींचा शर्ट, शिवकुमारचे आधार कार्ड आणि तुर्की बनावटीचे ऑटोमॅटिक पिस्तूल सापडली आहे. तर या हत्येसाठी प्रवीण लोणकरने हरीशला साठ हजार रुपये ट्रान्सफर केल्याचं तपासातून समोर आलं आहे.

Baba Siddique Shot Dead
Baba Siddique : खोलीसाठी दुप्पट भाडे, इंग्लिशमध्ये बोलायचे अन्...; सिद्दीकींचे हत्यारे असल्याचं कळताच कुर्ल्यातील चाळीत खळबळ

हरीशने आरोपी शूटर्सना 32,000 रुपये बाइक खरेदी करण्यासाठी दिले होते. तसंच शिवकुमार आणि धर्मराज यांना पैसे देण्यासह बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशात पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. याच सर्व माहितीच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत. शुभम, प्रवीण आणि झिशान हे या प्रकरणातील महत्त्वाचे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे.

तर ही हत्या सुपारी प्रकरणातून झाल्याचा संशय पोलिसांना असून त्यांनी त्या पद्धतीने तपास सुरू केला आहे. कारण, बाबा सिद्दीकी यांचे अनेक शत्रू होते. त्याच्यामागे बिल्डर लॉबी होती, त्यामुळे शिवाय बाबा सिद्दीकी यांचा एका व्यावसायिकाशीही वाद सुरू होता, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com