Gram Panchayat Election Result : राज्यभरातील 7135 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले होते. या ग्रामपंचायत(Gram panchyat) निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजप, शिंदे गटासह महाविकास आघाडीच्याही दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारराजा नेमका कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार तर कुणाला पराभवाचा धक्का देणार हे काही तासांत स्पष्ट होणार आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट, भाजप ठाकरे गट अशा थेट लढती झाल्या असल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयासाठी कंबर कसली आहे. प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी देखील या निवडणुकीकडे गांभीर्याने लक्ष देत जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. यापैकी काही ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. यामुळे आज बिनविरोधात निवडणुका वगळता, प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले होते. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. यापैकी नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:
ठाणे - 35, पालघर - 62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, अहमदनगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176, सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, औरंगाबाद - 208, बीड - 671, नांदेड - 160, उस्मानाबाद- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338, हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261, वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25. एकूण - 7,135.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.