Maharashtra Election Survey : महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणूक झाली तर मतदारांचा कौल काय? काय सांगतो ताजा सर्व्हे?

Maharashtra Loksabha Election Survey : भाजप आणि महाविकास आघाडीत एका टक्क्याचा फरक..
Maharashtra Election Survey :
Maharashtra Election Survey : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेतल्या अभूतपूर्व फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाल्याने आता सर्व राजकीय गणितं बदललेली आहेत. आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक (Lok Sabha ELection 2024) झाली तर निकाल संभाव्य निकाल काय असेल? जनमत कुणाकडे असेल? याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता एका ताज्या सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोप आले आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Election Survey :
Karnataka Politics : शेजारील राज्यातही अजित पवार तयार होऊ शकतात..; माजी मुख्यमंत्र्यांच्या विधानानं खळबळ..

पुढील वर्षी २०२४ मध्ये निवडणुका होणार आहेत. मात्र याबाबत टाईम्स नाऊ नवभारतने महाराष्ट्राबाबत एक सर्वे केला आहे. आज जर का महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान होईल? असा प्रश्न सर्वेक्षणात समाविष्ट लोकांना विचारण्यात आला. या सर्वेचे धक्कादायक आणि आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत.

कोणत्या पक्षाला किती मतं?

टाईम्स नाऊच्या या सर्वेक्षणानुसार, आज राज्यामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपला (BJP) सर्वाधिक मते मिळणार आहेत. सर्वेक्षणात भाजपच्या पारड्यात ४३.१० टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे याबाबत महाविकास आघाडीही फार दूर नाही. महाविकास आघाडीला ४२.१० टक्के मते मिळू शकतात.

तसेच, इतरांना १४.८० टक्के मते मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या मतांच्या तुलनेत भाजप पुढे असले तरी, महाविकास आघाडी मतांच्या टक्केवारीत केवळ १ टक्का मागे आहे.

Maharashtra Election Survey :
Shinde-Fadnavis-Pawar Government: शिंदे-फडणवीस-पवार सरकार नेमकं काय आहे ? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

कोणला किती टक्के मतं?

भाजप - 43.10 टक्के

महाविकास आघाडी - 42.10 टक्के

इतरांच्या मतांचा वाटा - 14.80 टक्के

Maharashtra Election Survey :
Shinde-Fadnavis-Pawar Government: शिंदे-फडणवीस-पवार सरकार नेमकं काय आहे ? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

मागील लोकसभेतील चित्र काय?

भाजपची शक्ती अनेक राज्यातून कमी झालेली दिसून येत आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यामध्ये भाजपचा प्रभाव ओसरू लागल्याचे चित्र आहे. या तीनही राज्यात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने एकहाती अंमल राखले होते.

2019 च्या लोकसभेत भाजप-एलजेपी-आणि जेडीयू एकत्र येत ४० पैकी तब्बल ३९ जागा जिंकल्या. मात्र आता जेडीयूने भाजपशी फारकत घेतली आहे. बिहारची सत्ता ही भाजपने गमावली आहे. कर्नाटकमध्ये २८ पैकी २५ जागा भाजपने पटकावल्या होत्या. मात्र नुकतंच कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने दमदार यश मिळवत, भाजपचा दारूण पराभव केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com