Shinde-Fadnavis-Pawar Government: शिंदे-फडणवीस-पवार सरकार नेमकं काय आहे ? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

State Government After NCP Crisis : २०२४ मध्ये शिंदे गटाचे सर्व ५० आमदार निवडून येतील
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Meeting With Shivsena MLA : अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये अचनाक दमदार एन्ट्री झाली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या सरकारमधील सहभागामुळे शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा सुरू आहे. ज्यांच्यावर टीका करून भाजपसोबत आलो आता त्यांच्यासोबत बसण्याची वेळ आल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

दरम्यान, बुधवारी (ता. ५) राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे मेळावे पार पडले. त्यानंतर शिंदे गटाच्या अस्वस्थ आमदारांची बैठकही पार पडली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांच्या शंका-कुशंका दूर करण्याचा प्रयत्न केला. (Latest Political News)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Karnataka Politics : शेजारील राज्यातही अजित पवार तयार होऊ शकतात..; माजी मुख्यमंत्र्यांच्या विधानानं खळबळ..

अजित पवार सरकारमध्ये आल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटातील अस्वस्थाता पाहूनच मुख्यमंत्री नागपूर दौरा सोडून मुंबईला परतल्याची चर्चा आहे. या आमदारांची बुधवारी वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. बैठकीनंतर मात्र आम्ही कुणीही नाराज नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकीमध्ये पवार यांना सहभागी करून घेण्यापासून शिवसेनेच्या आमदारांच्या नाराजीपर्यंत सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांना राज्य सरकारमध्ये घेण्याचा निर्णय मला विश्वासात घेऊनच झाल्याचे सांगितले. गेल्यावेळी अजित पवार आणि टीम भाजपसोबत येण्यास उत्सुक होती. मात्र आपल्याला प्राधान्य देण्यात आले. अजित पवार आणि इतर बाबींबाबत माझ्या मनात असणारे प्रश्न स्पष्टपणे विचारले, तुम्हीही विचारू शकता, असे शिंदे यांनी आमदारांना आवाहन केल्याची माहिती आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
NCP Political Crisis : शरद पवारांना मोठा धक्का ! वायबी सेंटरच्या बैठकीला उपस्थिती लावलेल्या आमदाराचं २४ तासांतच अजितदादांना समर्थन

गेल्या वर्षी अजित पवार यांच्यावर टीका करून महाविकास आघाडी सरकारमधून आपण बाहेर पडलो. आता पवार यांनाच अर्थमंत्रीपद देण्याची चर्चा आहे. लोकांना हिंदुत्वाचा मुद्दा सांगून शिवसेनेचा शिंदे गट भाजपसोबत गेला होता. आता ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्यासोबत बसण्याची वेळ येणार असल्याची टीका होत आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आमादारांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. शिंदे म्हणाले, "गेल्या वर्षी शिवसेनेतून आपण भाजपसोबत आलो ते विचारांच्या हेतूने. विचारांतूनच आपली युती झालेली आहे. आता जे काही होतेय ते सर्व पॉलिटिकल अॅडजस्टमेंट आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेविरहित ही युती आहे. कुटुंबविरहित ही युती आहे."

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
NCP Crisis News : "ठाण्याच्या पठ्ठ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं पार वाटोळं झालं"; अजित पवारांनी आव्हाडांवर हल्लाबोल

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यासोबत आलेल्या आमदारांना आस्वस्थ करण्याचाही प्रयत्न केला. ते म्हणाले, "पहिल्या अडीच वर्षात झालेली कामे आणि एका वर्षात झालेल्या कामांत फरक जाणवतो ना? आपल्या पक्षाची लोकप्रियता वाढत आहे. या कामांच्या जोरावरच २०२४ मध्ये आपले सर्व ५० आमदार निवडून येतील, यात काही शंका नाही. आता जे काही घडले त्याची तुम्ही चिंता करू नका. "

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com