Ed Raid: देशमुख, मलिकांच्याही पाठीशी उभे होतात ; काही फरक पडणार नाही..

संजय राऊत यांचीच संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुने पुन्हा हल्लाबोल सुरू आहे.
rohit pawar, Sanjay Raut, atul bhatkhal
rohit pawar, Sanjay Raut, atul bhatkhalsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात सध्या ईडीच्या कारवाईवरून (Ed Raid) जोरदार खडाखडी सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीने कारवाईचा सपाटा लावला आहे. शिवसेनेची धडाडणारी तोफ, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचीच संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुने पुन्हा हल्लाबोल सुरू आहे.

''ही कारवाई कायदेशीर आहे, यात भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही,'' असे भाजप नेते सांगत आहेत. तर ''ही कारवाई केवळ सूडबुद्धीने सुरू आहे. हा संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे,'' असे शिवसेना नेते सांगत आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राऊतांना ‘आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत’असे सांगितले होते. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

rohit pawar, Sanjay Raut, atul bhatkhal
तुम मुझको कब तक रोकोगे ; राऊतांचं भाजपला खुलं आव्हान

'आम्ही खंबीरपणे संजय राऊत यांच्या पाठिशी आहोत' इति रोहित पवार. तसे तुम्ही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे होतात.जे काही होईल ते कायद्यानेच होईल. तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे रहा अथवा उभे राहू नका, काही फरक पडणार नाही,'' असे टि्वट करीत भातखळकरांनी पवारांना डिवचलं आहे.

''देशात ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथे ईडी ,सीबीआय ,आयटी लावून विरोधकांच्या चौकशा करुन त्यांना संपवण्याचा भाजपचा डाव आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने हा प्रयत्न केला. महाराष्ट्रात तर सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, मात्र त्यांना यश येत नाही. कुणी नेता चुकला म्हणून ही कारवाई होत नाही तर चौकशी यंत्रणांच्या माध्यमातून एखाद्याला बदनाम करण्याचा कार्यक्रम सुरु आहे,'' असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

rohit pawar, Sanjay Raut, atul bhatkhal
शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम ; मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने मंगळवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे. ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली अलिबाग आणि दादरमधील राहता फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. याच कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक झाले आहेत.

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी टि्वट करीत आपल्यावरील आरोपाचे खंडन केलं आहे. ''एक रुपयांचा जरी व्यवहार झाला आहे अशा प्रकरणात हे सिद्ध करु शकले तरी जप्त केलेली प्रॉपर्टीच काय.. माझ्याकडे जे काही थोडं फार शिल्लक आहे ते मी भाजपला दान करायला तयार आहे,'' असे म्हणत 'तुम मुझको कब तक रोकोगे,' असं टि्वट करीत राऊतांनी भाजपला (BJP)आव्हान दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com