वानखेडेंना अडचणीत आणणाऱ्या साईलच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून धक्कादायक खुलासे

समीर वानखेडेंना अडचणीत आणणारे पंच प्रभाकर साईल याच्याबाबत आणखी धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
Prabhakar Sail
Prabhakar SailSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : क्रूझ पार्टीप्रकरणी (Cruise Party) अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडेंना (Sameer Wankhede) अडचणीत आणणारे पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याच्याबाबत आणखी धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. साईल आणि याच प्रकरणातील पंच के.पी. गोसावी (K.P.Gosavi) यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले असून, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रभाकर साईल हा क्रूझ पार्टी प्रकरणात पंच आहे. या प्रकरणातील पंच के.पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम म्हणून साईल काम करीत होता. त्याने केलेल्या आरोपांमुळे एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता गोसावी आणि साईल यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

व्हॉट्सअॅप चॅटनुसार, गोसावी हा खंडणीचे रॅकेट चालवत होता. क्रूझ पार्टी प्रकरणाचा कट आधीच आखण्यात आला होता. एनसीबीने छापा मारलेले क्रूझ गोव्याकडे निघण्याआधीच हा कट शिजला होता. हे क्रूझ २ ऑक्टोबरला गोव्याकडे रवाना झाले होते. याचबरोबर गोसावीने अनेक फोटो व्हॉट्सअॅपवर साईलला पाठवले होते. त्याने साईलला क्रूझवर पाठवले होते. या फोटोतील व्यक्ती क्रूझमधून बाहेर पडताना दिसल्यास तातडीने कळवण्यास त्याने सांगितले होते. त्यांनी क्रूझवर हजर असतील असे 10 बडे मासे निवडले होते. बड्या व्यक्तींच्या मुलांचा त्यात समावेश होता.

Prabhakar Sail
मी डुकरांशी कुस्ती खेळत नाही! फडणवीसांचे वादग्रस्त ट्विट

साईल यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यनला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही त्यांनी केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जिवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा त्यांनी केला होता.

Prabhakar Sail
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर उतारा; तेल कंपन्यांकडून 'आठवडी बोनस'

क्रूझ पार्टीप्रकरणात पुरावे म्हणून साईल यांनी काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर गोसावी हे आर्यन खानजवळ बसून त्याच्या फोनवरून कुणाशी तरी बोलणे करून देत असल्याचे दिसत होते. साईल यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे. याचबरोबर त्यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com