Sameer Wankhede CBI Inquiry: 'ते' सीसीटीव्ही फुटेज कुठे गायब झालं? समीर वानखेडेंवर सीबीआय'कडून प्रश्नांची सरबत्ती

Sameer Wankhede News| सीबीआय'ने आज तीन तासांहून अधिक वेळ समीर वानखेडे यांची चौकशी केली.
Sameer Wankhede Latest Marathi News
Sameer Wankhede Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

Sameer Wankhede CBI Inquiry: अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने 24 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 मे रोजी होणार आहे.काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना संरक्षण दिलं पण सीबीआयला तपासात सहकार्य करण्याचेही निर्देश दिले. याप्रकरणी आज पुन्हा एकदा त्यांची सीबीआय चौकशी झाली. (Where did 'that' CCTV footage disappear? CBI questions Samir Wankhede)

Sameer Wankhede Latest Marathi News
High Court on Sameer Wankhede: समीर वानखेडेंना दिलासा; 24 मे पर्यंत अटक नाही

काय झालं सीबीआय चौकशीत?

बीकेसीतील सीबीआयच्या कार्यालयात समीर वानखेडेंची आज तीन तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे दिल्लीतील सीबीआयचे एक पथकही चौकशीसाठी मुंबईत हजर झाले आहे. आर्यन खान अटक प्रकरणासह, समीर वानखेडे यांची संपत्ती, त्यांच्याकडे महागड्या गाड्या कुठून आल्या, परदेश वाऱ्यांवरील खर्च इत्यादी विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (Sameer Wankhede News)

दरम्यान, आर्यन खान अटक प्रकरणातील वादग्रस्त घडामोडी ५० लाख रुपये कथिररित्या स्वीकारल्याचा आरोप, अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे तत्कालीन प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी झालेला वादग्रस्त संवाद आणि एनसीबीच्या एसआयटीने सादर केलेला अहवाल या सर्व मुद्द्यांवरुन वानखेडेंना प्रश्न विचारले जात आहेत.

Sameer Wankhede Latest Marathi News
Sameer Wankhede News : वानखेडे भाजपचे कोण लागतात? आरएसएसच्या मुख्यालयात येऊन ते कोणाला भेटले? : पटोलेंचा सवाल

याशिवाय, ज्या दिवशी आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं त्या दिवशीचं सीसीटिव्ही फुटेज का गायब आहे. हे ऑपरेशन कोणत्या पद्धतीने राबवण्यात आलं, त्या प्रकऱणात जे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यात किती तथ्य आहे, हे तपासण्यासाठी वानखेडेंची चौकशी करण्यात येत आहे.

सीबीआय'ने (CBI) वानखेडे यांच्यावर आरोप पत्रात गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुखकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली होती. पण हा सौदा १८ कोटींवर आला. यात किरण गोसावीने ५० लाख रुपये आगाऊ घेतले होते. इतकेच नव्हे तर, वानखेडेंना इतक्या महागड्या गाड्या कशा घेतल्या, याचाही हिशोब देता आला नाही, तसेच फॉरेन ट्रिपचाही हिशोब देता आले नाही. (Sameer Wankhede CBI Raid)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com