ShivSenaUBT party : 'EVM'विरोधात आंदोलन पेटलं; शिवसेना ठाकरे पक्षानं 'EVM'ची प्रतिकृती अरबी समुद्रात नेली...

EVM machines elections ShivSenaUBT party workers Mumbai : 'EVM' मशीनला विरोधासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून, 'EVM'ची प्रतिकृती थेट समुद्रात नेली.
EVM
EVMSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : 'EVM' मशीन हटवण्यासाठी आणि देशात त्याविरोधात आंदोलन उभारण्यासाठी आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली.

यात शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 'EVM' मशीनची प्रतिकृती मुंबईतील अरबी समुद्रात विसर्जित केली. यामुळे आगामी काळात 'EVM' विरोधात देशभरात आंदोलन पेटणार असल्याचे संकेत मिळाले आहे.

'EVM' विरोधात मुंबईत शिवेसना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. 'EVM' प्रतिकृती अरबी समुद्रात नेत, लोकशाही वाचवायची आहे, असे सांगून शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. 'EVM' विसर्जित केले नाही, तर लोकशाही विसर्जित होईल, प्रगत देशात 'EVM' नाही मग भारतात का? ''EVM' हटवा, लोकशाही वाचवा', असं म्हणत शिवसेना ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.

EVM
BJP Prasad Lad : दोन हजार लोकांसह हल्ला करणार; भाजप नेत्याला धमकी दिल्याने खळबळ

शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी 'EVM' विरोधात आंदोलन केले. 'EVM'ची प्रतिकृती तयार करून, तिला अरबी समुद्रात विसर्जित केली. सध्या सत्ताधारी आणि विरोधक 'EVM'च्या मुद्द्यावरून आमने-सामने आहेत. यात मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 'EVM'विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

EVM
BJP Mission Mumbai : 'प्लॅन तयार आहे, मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार'; आशिष शेलारांचा 'कॉन्फिडन्स'

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात 'EVM' मशीन हटवण्यासाठी 'माॅक पोल' घेण्याचे ठरवले होते. त्यावरून विरोधक आमने-सामने आले आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी तिथं जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर आज भाजपचे राम सातपुते, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडी गावात सभा घेऊन महाविकास आघाडीवर टीका केली. भाजप नेते मंडळी मारकडवाडी गावात असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील ग्रामस्थांची संवाद साधला. आज दिवसभर 'EVM'वरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते.

याशिवाय इंडिया आघाडीचे आज दिल्लीत बैठक झाली. यात बैठकीत 'EVM' मशीन हटवण्यावर देशात आंदोलन उभं करण्याचा निर्णय झाला. 'EVM' मशीनवरील संशय दूर होण्यासाठी देशात एकदा बॅलेट पेपर निवडणुका झाल्या पाहिजेत, असा सूर इंडिया आघाडीच्या बैठकीतील नेत्यांनी अळवला होता. यातच मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाने 'EVM' मशीनची प्रतिकृती अरबी समुद्रात नेत विसर्जित केल्याने आगामी काळात हे आंदोलन पेटणार असल्याचे संकेत दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com