Amit Shah Mumbai Tour : अमित शाह मुंबईत असूनही अजित पवार बारामतीला का निघून गेले ?

Amit Shah to visit Lalbagh Raja : अमित शाहांनी शिंदे-फडणवीसांची तब्बल ४५ मिनिटे बंद दाराआड बैठक घेत राज्यातील घडामोडींवर चर्चा केली.
Amit Shah and Ajit Pawar
Amit Shah and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भेट देत शिंदे-फडणवीसांबरोबर तब्बल ४५ मिनिटे चर्चा केली. मात्र, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

अमित शाह मुंबईत आले की भाजपला बळ मिळतं. भाजपची सर्व मंडळी आपले आधीचे कार्यक्रम रद्द करून अमित शाहांबरोबर दिसतात. आजही शाहांबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह फडणवीस होते. पण याच सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शाह मुंबईत असताना बारामतीला निघून गेले. शाहांच्या दौऱ्यात अजितदादांच्या गैरहजरीमुळे राज्याच्या राजकारणात सर्व काही आलबेल आहे का, याबाबत आता संशयाचे ढग निर्माण होत आहेत.

Amit Shah and Ajit Pawar
CM Shinde and Fadnavis meet Amit Shah : शाह-शिंदे-फडणवीसांची ४५ मिनिटं चर्चा; राजकीय उलथापालथ होणार ?

अमित शाहांनी शिंदे-फडणवीसांची तब्बल ४५ मिनिटे बंद दाराआड बैठक घेत राज्यातील घडामोडींवर चर्चा केली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश शाहांनी दिले. पण अजित पवारांच्या गैरहजरीत शाहांनी शिंदे-फडणवीसांशी केलेल्या चर्चेत नेमकं काय रणनीती ठरली, याबाबत आता तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजितदादांनी एन्ट्री केल्यानंतर अनेकदा अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. त्यानंतर मात्र या चर्चांचे वृत्त फेटाळण्यात आले. आता पुन्हा एकदा शाहांच्या दौऱ्यात अजितदादांच्या गैरहजरीने राज्याच्या राजकारणात उलटसुलट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. तर या गैरहजरीवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) काय स्पष्टीकरण देते, हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Amit Shah and Ajit Pawar
Konkan Politics : दापोलीत भाजप कदमांना साथ देईल; पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाद विसरतील काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com