Who Is Gangster Raja Thakur : राऊतांनी आरोप केलेला ठाण्यातील गुंड आहे तरी कोण? : खूनप्रकरणी जन्मठेप; २०१९ पासून जामीनावर

आपल्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात आहे. असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

ठाणे : आपल्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात आहे. त्या हल्ल्याची सुपारी ठाण्यातील (Thane) गुंड (gangster) राजा ठाकूर (Raja Thakur) याला देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, राऊतांनी ज्या गुंड ठाकूरचा उल्लेख केला आहे, तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याला खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. (Who is Thane gangster Raja Thakur accused by Sanjay Raut?)

रविचंद उर्फ राजा ठाकूर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. जानेवारी २०११ मध्ये ठाणे-बेलापूर रस्त्यावर कळवा येथील विटावा पुलाखाली दीपक पाटील नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी म्हणून राजा ठाकूर याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एप्रिल २०१९ पासून तो जामिनावर आहे.

Sanjay Raut
Patole On Chavan : अशोक चव्हाणांवर पाळत का ठेवली जात आहे? : नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्याने पोलिसांसमोर हजेरी न लावल्याने ऑक्टोबर २०२२ मध्ये गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने त्याला येऊर येथून अटक केली होती. त्यानंतर तो पुन्हा जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याची अनेक राजकीय पुढाऱ्यांशी जवळीक वाढल्याचे सांगितले जाते.

Sanjay Raut
Rajan Patil News : गोव्याचे मुख्यमंत्री राजन पाटलांच्या भेटीला : अनगरकरांचे भाजपच्या दिशेने आणखी एक पाऊल

केवळ सहानुभूती आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी हा प्रकार केला असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे. संजय राऊत आणि त्यांचा भाऊ हे मांडवली बादशहा असून अनेक गुंडांची मांडवली करण्याचे काम ते करतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Sanjay Raut
Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड : सरन्यायाधीशांचा सवाल; ठाकरे गटाच्या वकिलांनी सुचविला ‘हा’ तोडगा

राजा ठाकूरचा राऊतांना इशारा

संजय राऊत यांनी केलेले आरोप हे निराधार आहेत. माझ्या बदनामीचा कट रचला जात आहे आणि यावर मी कायदेशीर मार्गाने कारवाई करणार आहे, असा इशारा गुंड राजा ठाकूर याने दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com