पुणे : मुंबईतील धारावीपासून ते नागपूरपर्यंत दुपारी अचानक दहावी-बारावीचे (SSC Exam) विद्यार्थी रस्त्यावर आले. या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येण्याचे आव्हान करणारा 'हिंदुस्थानी भाऊ' (Hindusthani Bhau) कोण आहे. याचा शोध सुरु झाला आहे.
विकास पाठक तथा हिंदुस्थानी भाई म्हणून हे पात्र सोशल मीडियात प्रसिद्ध आहे. त्याने 26 जानेवारी रोजी यासाठीचा व्हिडीओ जारी करून 31 जानेवारीला आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. यामुळे महाराष्ट्रभर आंदोलन पेटले. त्याला यूट्यूब YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल साईटवर (Social Media) मोठ्या प्रमाणात फॅालोअर्स आहेत. विकास पाठक सोशल मीडियावर विविध नेत्यांचे वादग्रस्त व्हिडीओ प्रसिद्ध करत असतो. नेते बोलत असतानाचे त्यांचे एक दोन मिनिटांचे व्हिडीओ कट करुन त्यामध्ये 'रुको जरा' 'आगे देखो' सबर करो...असे शब्दप्रयोग करतो. हे डायलॅाग अनेकदा आपण ऐकला अथवा पाहिला असेल. या डायलॉगमुळेच हिंदुस्थानी भाऊ प्रसिद्धीझोतात आला आहे.
त्यामुळे ते व्हिडीओ प्रचंड पाहिले जातात. पाठक हा मुंबईमध्ये राहतो. तो त्याच्या बहुतेक व्हिडिओंमध्ये मुंबईकर उच्चारात बोलतो आणि अतिशय अपमानास्पद भाषा वापरतो. तो प्रामुख्याने यूट्यूबवर अपमानास्पद व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ओळखला जातो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषेच्या वापरामुळे तो विद्यार्थ्यांमध्येही प्रसिद्ध आहे. त्याच्या या प्रसिद्धीमुळे त्याला सलमान खानचा 'बिग बॉस' या शोमध्येही संधी मिळाली होती. तो या शोच्या सीजन १३ मध्ये दिसला होता. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर वादग्रस्त वक्तव्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे.
हिंदुस्थानी भाऊ याने सोशल मीडियावर ऑनलाइन परीक्षा घेण्याचा मागणीला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शेअर केली होती. त्याने 26 जानेवारी रोजी यासाठीचा व्हिडीओ जारी करून 31 जानेवारी रोजी आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय असल्याचे मत त्याने व्यक्त केले होते. त्याच्या या आव्हानाल पाठिंबा व्यक्त करत हजारो विद्यार्थी रस्त्यावर आले. दरम्यान, दादरमधील शिवाजी पार्कमध्ये गेल्या वर्षी हिंदुस्थानी भाऊ विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करा, आणि शुल्क माफ करा या मागणीसाठी आंदोलनाला बसला होता. त्यावेळी कोरोना नियमांचे उल्लघंन केले म्हणून पोलिसांनी भाऊला ताब्यात घेतले होते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक एक पत्रकार होता. विकास पाठक मुंबईमधील एका स्थानिक वर्तमानपत्रात क्राईम रिपोर्टरचे काम करत होता. क्राईम रिपोर्टिंगसाठी 2011 मध्ये त्याला पुरस्कारही मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.