'पुरंदरे, टिळक यांच्या समर्थनामुळे राज ठाकरे यांची आयडॉलॉजी स्पष्ट होते!'

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली, आणि तिचा शोध महात्मा फुले यांनी घेतला.
Shrimant Kokate, Raj Thackeray
Shrimant Kokate, Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद (Aurangabad) येथे झालेल्या सभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली असल्याचे म्हटले होते. त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत श्रीमंत कोकाटे म्हणाले, राज ठाकरे इतिहासाची मोडतोड करत आहेत, याला आमचा आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात श्रीमंत कोकाटे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेशी आम्हाला देणे घेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली, आणि तिचा शोध महात्मा फुले यांनी घेतला. शिवाजी महाराजांची मुद्रा कोणत्याही राजकीय पक्षाने वापरु नये, असा इशाराही कोकाटे यांनी दिला.

Shrimant Kokate, Raj Thackeray
पोलिसांनी राज ठाकरेंचे भाषण वारंवार पाच तास ऐकले... नंतरच घेतला कारवाईचा निर्णय...

जबाबदार नेता असतो त्याने अभ्यासपूर्ण बोलायला हवे, जाती-जातीत तेढ निर्माण करणे हे लोकनेत्याचे लक्षण नाही. राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे, टिळक यांचे समर्थन करतात यातून त्यांची आयडॉलॉजी स्पष्ट होते. राज ठाकरे पुरंदरे यांच्या प्रेमात अडकले आहेत. त्यांना इतर काही समजून घायचे नाही. टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा एक दगडही बांधला नाही, असेही कोकाटे यांनी सांगितले.

Shrimant Kokate, Raj Thackeray
कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी राज्याबाहेरून लोकं येणार; पोलिसांना खबरदारीच्या सुचना

याउलट लोकमान्य टिळकांनी शिव स्मारकासाठी गोळा केलेला निधी स्मारकाच्या कामासाठी वापरला नाही, असा आरोपही कोकाटे यांनी केला. राज ठाकरे जातीयवादी आहेत म्हणून टिळक आणि पुरंदरे यांचे समर्थन करतात, असा टोला त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com