जितेंद्र आव्हाडांनी फडणवीसांची भेट का घेतली?; चर्चेला उधाण...

Jitendra Awhad : आव्हाडांनी फडणवीसांची भेट घेतल्याने अनेकांकडून तर्कवितर्क लावले जात आहे.
Jitendra Awhad, Devendra Fadnavis Latest News
Jitendra Awhad, Devendra Fadnavis Latest NewsSarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप बघायला मिळाला. यामुळे राज्यात सत्तांतर घडलं आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या राजकारणात कधी काय होईल. हे सांगणे कठीण झाले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Fadnavis) यांनी आज (ता.26 सप्टेंबर) भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतल्याची माहीती मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तूळाच चांगलीच चर्चा रंगत आहे. या भेटीत नेमक काय झालं याबाबातची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. (Jitendra Awhad, Devendra Fadnavis Latest News)

Jitendra Awhad, Devendra Fadnavis Latest News
बाळासाहेबांचा लाडका चंपासिंह थापाही शिंदेंच्या गळाला...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांच्या साथीने आणि भाजपच्या समर्थनाने त्यांनी नवं सरकार स्थापन केलं आहे. यानंतरही सेनेचे १२ खासदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी शिंदेंनी केली असून ती अद्यापही सुरूच आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांची मोठी डोकेदुखी होत आहे.

आता सेनेचे डॅमेज कट्रोल करण्यासाठी खुद्द युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. यामुळे दोन्ही गटामध्ये कमालीची चुरस बघायला मिळत आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपच्या नेत्यांशी होणाऱ्या भेटीने अनेकांकडून तर्कवितर्क लावले जात आहे.

Jitendra Awhad, Devendra Fadnavis Latest News
नऊशे शेतकरी MIDC ला देणार ३७२ एकर क्षेत्र; आमदार बोर्डीकरांच्या मध्यस्थीने होणार बैठक

नुकतेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी केद्रींय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची मोठी चर्चा झाली होती. यावर खडसे यांना स्पष्टीकरणं द्यावे लागले होते. तर भाजपकडूनही स्पष्टीकरणं देण्यात आलं. या भेटीच्या चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारांचे विश्वासू असलेले माजी मंत्री आव्हाड यांनीही आज मंत्रालयात जावून फडणवीसांची भेट घेतल्याने यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

दरम्यान या भेटीनंतर आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद न साधता ते निघून गेले. मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. परंतू या भेटीची चर्चा जोरात रंगत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com