Supriya Sule News: भाजपनं फडणवीसांना मुख्यमंत्री का नाही केलं? सुप्रिया सुळेंचा सवाल

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यचा घेतला समाचार
Supriya Sule, Chandrashekhar Bawankule
Supriya Sule, Chandrashekhar BawankuleSarkarnama

Maharashtra Politics : पहाटेचा शपथविधी आणि महाविकास आघाडी सरकार येण्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची खेळी असल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी वारंवार करत आहेत.

पहाटेच्या शपथविधीप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार, वंचितचे प्रकाश आंबेडकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विधानानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यातच शरद पवार हेही या शपथविधीचे वेगळ्या पद्धतीने समर्थन करीत आहेत. त्यांच्यानुसार त्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटण्यास मदत झाली आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर सूत्रे हलली आणि अजित पवारांनी (Ajit Pawar) माघार घेतली. त्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी महाविकास आघाडी तयार केली. या आघाडीने उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन केले.

याच पार्श्वभूमीवर शरद पवारांवर (Sharad Pawar) भाजपचे पदाधिकारी आरोप करताना दिसत आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी शरद पवारांना भाजपशी युती करायची होती; मात्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यांना फडणवीस सोडून इतर कुणीही मुख्यमंत्री चालला असता, असा खळबळजनक दावा बावनकुळे वारंवार करताना दिसत आहेत.

Supriya Sule, Chandrashekhar Bawankule
Shrikant Shinde News : अखेर श्रीकांत शिंदेंनी मौन सोडलं; म्हणाले,''महाराष्ट्राला राऊतांची गरज,कारण...''

बावनकुळे म्हणतात की, "पवारांनी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते. फडणवीस यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, कामाचा झपाटा राज्याने पाहिला आहे. ते मुख्यमंत्री झाले असते तर राष्ट्रवादी पक्ष संपुष्टात आला असता, अशी भीती शरद पवारांना होती. त्यातूनच त्यांनी सुत्रे हलविली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले."

Supriya Sule, Chandrashekhar Bawankule
Kasba By-Election : दगडूशेठ मंडळाच्या गोडसे परिवाराचा रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा

बावनकुळे हे पवारांवर षडयंत्र रचल्याचा आरोप करतात. त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज समाचार घेतला आहे. सुळेंनी फडणवीस यांचा पहिला आपमान हा भाजपनेच केला असा म्हणत पलटवार केला आहे.

सुळे म्हणाल्या की, "भाजपसाठी माझा एक प्रांजळ प्रश्न आहे. भाजपचे १०५ आमदार असतानाही ४० आमदार असलेल्यांना तुम्ही मुख्यंमत्री पद का दिलं? १०५ आमदार असूनही फडणवीस यांना मुख्यमंत्री पद दिले नाही. त्यामुळे भाजपनेच देवेंद्र फडणवीस यांचा पहिला आपमान केला आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com