Shrikant Shinde News : अखेर श्रीकांत शिंदेंनी मौन सोडलं; म्हणाले,''महाराष्ट्राला राऊतांची गरज,कारण...''

Maharashtra Politics: माझ्यावरील आरोप हा हास्यास्पद प्रकार...
Shrikant Shinde & sanjay Raut
Shrikant Shinde & sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Shrikant Shinde On Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांनी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांनाही तसं पत्रं पाठवलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

मात्र,यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता शिंदे यांनी मौन सोडलं असून या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे.

श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, माझ्यावरील आरोप हा हास्यास्पद प्रकार आहे. नरेश म्हस्के पुराव्यासकट बोलले आहेत. संजय राऊत यांचे सहकारी चिंदरकर यांचाही जबाब पोलिसांनी घेतला.

आधी राऊत म्हणाले, जीवे मारायची सुपारी दिली. मग जबाब दिला, काळे फासणार आहेत. हे चिंदरकर यांनी सांगितल्याचं म्हणाल्यामुळे त्यांचा जबाब पोलिसांनी घेतला. मी कुणाचं नाव घेतलं नाही असं चिंदरकरांनी आपल्या जबाबात म्हटलं होतं. त्यामुळे दोन्ही जबाबात विरोधाभास आहे असंही श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यावेळी म्हणाले.

Shrikant Shinde & sanjay Raut
Nagpur : महानगरपालिका हातून गेली, तर भाजपला लोकसभा जिंकणे अवघड; म्हणून...

'' महाराष्ट्राला संजय राऊत यांनी गरज..''

श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, संजय राऊतांची खूप काळजी वाटते. त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती आहे. ते रोज सकाळी उठून कुणावरही आरोप करतात. पण मी एक डॉक्टर आहे. त्यामुळे त्यांच्या वागणुकीकडे पाहून सिझोफ्रेनियासारखा आजार त्यांना होतोय का? असं वाटतं. ते काल्पनिक, आभासी विश्वात राहतात. महाराष्ट्राला संजय राऊत(Sanjay Raut) यांनी गरज आहे, कारण सकाळी त्यांच्यामुळे महाराष्ट्राची करमणूक होते. त्यामुळे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असा खोचक टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

Shrikant Shinde & sanjay Raut
Solapur News : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जावयास अटक

श्रीकांत शिंदेंवरील आरोप, राऊतांवर गुन्हा दाखल

संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर शिंदे समर्थक आक्रमक झाले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करत ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com