
Kabutarkhana, Dadar, Jain community protest, : दादरमधील कबुतरखाना हटवण्यासवरुन जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने टाकलेली ताडपत्री हटवण्यात आली आहे. यावरुन वाद रंगला आहे.
ताडपत्री काढत असताना पोलीस आणि जैन समाज याच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. दादरच्या रस्त्यावर जैन समाज उतरला आहे. महिलांचा यात लक्षणीय सहभाग आहे. महिलांनी ताडपत्री फाडून आत प्रवेश केला. हा कबुतरखाना पुन्हा सुरु करावा, अशी विनंती जैन समाजाने राज्य सरकारला केली आहे.
दादरमधील ऐतिहासिक कबुतरखान्याला वाचवण्यासाठी आज सर्वधर्मीयांकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होते. पण ही सभा रद्द करण्यात आली. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारात अचानक कबुतरखाना परिसरात गर्दी झाली.
महिलांनी कबुरतखाना परिसराला लावलेल्या ताडपत्रीचे बांबू तोडले. ताडपत्री फाडली. कबुरतखाना परिसरात महिलांनी ठिय्या मारला. मुंबई महापालिका, राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करुन आंदोलकांना अडवले.
आज कबुतरखाना परिसरात जे झाले ते चुकीचे झाले. कायद्या हातात घेऊ नका, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मुंबईकरांनी शांतता राखावा. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असे लोढा म्हणाले.
उद्या न्यायालयात याबाबत सुनावली आहे, त्यामुळे सर्वांनी शांतता राखावा, अशी विनंती लोढा यांनी आंदोलकांनी केला. त्यानंतर जैन समाजाचे आंदोलन मागे घेतले. जैन समाज या आंदोलनात नव्हता, कुणीतरी बाहेरच्या व्यक्ती आंदोलनात घुसले होते, असे लोढा यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितले.
कबुतरखान्यात दाणे टाकण्यास परवानगी नसताना आज काहींनी दाणे टाकले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने ताडपत्री टाकून कबुतर खाना बंद केला होता. असे असताना जैन समाजाकडून तो पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आक्रमक होताना दिसला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बैठक घेतली. कबुतरखाना हटवण्याच्या भूमिकेत मधला मार्ग काढून जनतेच्या आरोग्याचाही विचार करणार आहे. यामध्ये कबुतरांनाही इजा झाली नाही पाहिजे. यादृष्टीने महापालिकेला सर्व खबरदारी घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.