Ajit pawar news live: जयंत पाटील-जितेंद्र आव्हाडांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी अजितदादांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

जयंत पाटील यांनीही विधानसभेच्या अध्यक्षांकडे अजित पवार यांच्यासह नऊ जणांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पत्र दिले होते.
Ajit pawar news live:
Ajit pawar news live: Sarkarnama
Published on
Updated on

Political News: अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यानंतर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. यानंतर आता सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. याबरोबरच अजित पवारांची राष्ट्रवादीचे विधिमंडळ गट नेते म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

मात्र, आता जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्यासंदर्भात आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे, अशी माहीती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

Ajit pawar news live:
NCP President: अजित पवार सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष करणार? बैठकीत झाली 'ही' चर्चा!

तर जयंत पाटील यांनी रविवारी विधानसभेच्या अध्यक्षांकडे अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पत्र दिले होते.

मात्र, आता जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावरच अपात्रतेची कारवाई व्हावी, यासाठी अजित पवारांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे पत्र दिले असल्याची माहिती त्यांनीच माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Ajit pawar news live:
Ajit Pawar News : रुपाली चाकणकर, सुरज चव्हाण अन् अमोल मिटकरींवर मोठी जबाबदारी

यावेळी सुनिल तटकरे यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती केली. तसेच प्रदेश प्रवक्तेपदी अमोल मिटकरी, आनंद परांजपे, संजय तटकरे यांची नियुक्ती केली आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com