Sharad Pawar on NCP : राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द का करण्यात आला? खुद्द पवारांनीच सांगितलं कारण

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यामुळे राष्ट्रवादीला काय फटका बसणार? शरद पवार यांनी सांगितलं...
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी प्रादेशिक पक्ष असणार आहे. आता याच विषयावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच भाष्य केलं आहे.

तसेच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यामुळे पक्षाला नेमकी काय फटका बसेल? आणि राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचे कारण काय होतं? हे शरद पवार यांनी सांगितले आहे. ते आज एका वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, ''राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय? त्याचा अर्थ असा आहे की, एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर देशातील कोणत्याही राज्यामध्ये त्या पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह तेथे त्यांना मिळते.

त्याशिवाय काही सवलती देखील मिळतात. सवलती अशा असतात की, निवडणुकीचा प्रचार सुरू झाला की त्यामध्ये पक्षाला किंवा उमेदवाराला कॅम्पियन करण्यासाठी जे लोकं हवे असतात. ते लोकं किंवा त्यांची संख्या 40 च्या आसपास असते''.

Sharad Pawar
Goa Politics : ममता बॅनर्जींना दुसरा झटका: TMC नेते फालेरो यांचा राज्यसभेचा राजीनामा

''तसेच ज्यांच्याकडे राष्ट्रीय पक्षाची मान्यता असेल त्यांना काही सवलती असतात. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्षाची मान्यता गेली आहे. त्याच कारण असं आहे की, चार राज्यामध्ये सहा टक्के मत मिळायला हवीत. राष्ट्रवादीला महाराष्ट्रात सहा टक्के मत आहेत.

तसेच नागालँडमध्ये सहा टक्के मत आहेत. तसेच अजूनही काही ठिकाणी आहेत. तर अंदमान निकोबारमध्ये आमचा एक खासदार आहे. मात्र, तो भाग निवडणूक आयोगाने मान्य केला नाही. त्यामुळे आमची राष्ट्रीय पक्षाची मान्यता गेली'', असं शरद पवार यांनी सांगितलं.

Sharad Pawar
Sharad Pawar News: ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत; पवारांचं मोठं विधान

''आता यापुढे महाराष्ट्रात आमचे उमेदवार उभे राहिले तर त्यांना आमचं चिन्ह मिळेल. तसेच त्यांना प्रचाराच्या सर्व सवलती मिळतील. अशाच सवलती आम्हाला नागालँडमध्येही मिळतील. पण उद्या आम्ही कर्नाटकमध्ये उमेदवार उभे केले तर आमचं चिन्ह त्यांना मिळेल.

पण ज्या सवलती असतात त्या सवलती 100 टक्के न मिळता 50 टक्के मिळतील. तसेच अजून काही सवलती आम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे हा फटका आम्हाला बसेल'', असं शरद पवारांनी सांगितलं.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com