Shinde - Fadnavis - Pawar Government : मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजप मंत्र्यांचे राजीनामे घेणार का ? उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांंचं सूचक वक्तव्य

Cabinet Expansion : अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदं आणि खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis 
 Ajit Pawar Government
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या रविवारी (दि.२ जुलै) मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळून आल्यानंतर अजित पवारांनी थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण यामुळे सत्तासमीकरणं बदलली असून मंत्रिपदावरुन युती सरकारमध्ये नवा पेच निर्माण झाला आहे. याचदरम्यान, आता भाजपच्या काही मंत्र्यांचे राजीनामे घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचवेळी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अजित पवारां (Ajit Pawar) च्या एन्ट्रीमुळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदं आणि खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. आधीच राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे भाजपा आणि शिवसेनेतील नाराजांची संख्या मोठी आहे. याचवेळी आता राष्ट्रवादीही सत्तेत सहभागी झाली असून अजित पवारांसह आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आणि ही सर्व मंडळी सीनिअर असल्यानं त्यांना खातीही तितकीच महत्वाची मिळावीत यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. आता त्यासाठी भाजपमधील चार ते पाच मंत्री राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis 
 Ajit Pawar Government
Kishor Aware Murder Case : आवारे खूनाचा मुख्य सूत्रधार पकडला गेल्याने शेळके बंधूंच्या 'क्लीन चिट'ची शक्यता बळावली

मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असताना देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे सरकारमध्ये पक्षासाठी त्याग करून उपमुख्यमंत्रीपद घेतलं. त्यांच्यापाठोपाठ आता भाजपमधील काही मंत्र्यांवरही राजीनाम्याची टांगती तलवार आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतरच न नवनियुक्त मंत्र्यांचं खातेवाटप होण्याची शक्यता आहे. मात्र, आता खातेवाटपापूर्वी भाजपच्या चार ते पाच मंत्र्यांचे राजीनामे घेणार चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी फेटाळून लावल्याची माहिती आहे.

खातेवाटप अद्याप प्रलंबित

राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींच्या शपथविधीला आठवडा पूर्ण झाला आहे. अद्याप राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा खातेवाटप अद्याप प्रलंबित आहे. अशातच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की, शिंदे-फडणवीस-पवार सत्तेचं नवं समीकरणं जुळवणार असून खातेवाटपासाठी भाजपच्या चार ते पाच मंत्र्यांना मंत्रिपदाचा त्याग करत राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र, भाजपकडून या चर्चा फेटाळून लावण्यात आल्या आहेत. भाजपा(BJP)च्या उच्चपदस्थ सूत्रांनी कुठल्याही मंत्र्यांचे राजीनामे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis 
 Ajit Pawar Government
Maharashtra Political News : राज्याला दोन उपमुख्यमंत्री, मग आमच्या ग्रामपंचायतील दोन उपसरपंच का नको ?..

उच्च पदस्थ पदाधिकारी काय म्हणाले ?

शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीची कुठल्याही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार नाहीत. सध्या जे मंत्री आहेत, ते मंत्री राहतीलच. पण खातेवाटपासाठी आता ज्या मंत्र्यांकडे जास्तीची खाती आहेत. त्यापैकी काही खाती नव्या मंत्र्यांकडे सोपवली जातील. पण कुठल्याही मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं भाजपच्या उच्च पदस्थ पदाधिकारी यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com