Maharashtra Political News : राज्याला दोन उपमुख्यमंत्री, मग आमच्या ग्रामपंचायतील दोन उपसरपंच का नको ?..

Grampanchayat : महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच निवडीची परवानगी द्यावी.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : शिंदे-फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत असतांना राष्ट्रवादीचे ३२ आमदार अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी झाले. (Maharashtra Political News) अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाले आणि राज्याला पहिल्यादांच दोन उपमुख्यमंत्री लाभले.

Maharashtra Political News
Sanjay Shirsat On ministership News : मंत्रीपद मिळणार का ? केसरकरांनी संकेत दिले पण शिरसाटांचा विश्वास बसेना..

मात्र याचाच आदर्श घेत आता गावपातळीवरच्या राजकारणात देखील दोन उपसरंपच नेमण्याची परवानगी द्या, (Grampanchayat) अशी मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या मनूर येथील माजी सरपंचाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी (Marathwada) दोन उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची परवानगी राजीव साळुंके यांनी केली आहे.

जसे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांची निवड करू शकता, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच निवडीची परवानगी द्यावी. गावाच्या विकासासाठी सरपंचाला समर्थन देण्यासाठी व त्यांच्याकडून गावाचे काम करून घेण्यासाठी उपसरपंच हा महत्त्वाचा असतो.

आपण केलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवडीच्या धर्तीवर आता गावाच्या भल्यासाठी दोन उपसरपंच निवड करता यावी. त्यामुळे यावर सकारात्मक चर्चा करून, कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती साळुंके यांनी निवेदनात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com