

राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar News : नगर जिल्ह्याची जीवनदायिनी आणि शेतकरी वर्गासाठी बऱ्याच अंशी पाण्याचा प्रश्न मिटवणाऱ्या भंडारदरा धरण लवकरच १०० वर्षे पूर्ण करीत आहे. या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम घेऊन 'भारतातील पहिले वॉटर म्युझियम' भंडारदरा येथे सुरू करण्याचा प्रयत्न आमदार सत्यजीत तांबे यांनी सुरु केले असून, त्या संदर्भाने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. फडणवीस यांनीदेखील या उपक्रमाची तातडीने दखल घेत, भंडारदरा येथे वॉटर म्युझियम सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)
उत्तर नगरची जीवनवाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होत आहेत. भंडारदारा धरण नसते तर काय झाले असते? याची कल्पनासुध्दा नगर जिल्ह्यातील लोक करू शकत नाहीत. नगर जिल्हा तसा अवर्षणप्रवण जिल्हा आहे. मात्र एकमेव अकोले या आदिवासी बहुल सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भागात प्रचंड पाऊस पडतो. भंडारदरा आणि मुळा धरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा बरेचसे प्रश्न मिटले आहेत.
हिरवी गर्द झाडी, डोंगरे दऱ्या, नागमोडी रस्ते, आदिवासी परंपरागत वातावरण, पावसाळ्यात डोंगर रांगेतून पडणारे पाण्याचे शेकडो प्रपात, डोळ्याचे पारणे फेडणारे अक्राळविक्राळ उंचीवरून कोसळणारे धबधबे, कोकणकड्यावरील रिव्हर्स फॉल असे अनेक निसर्गाचे चमत्कार भंडारदऱ्याच्या कुशीत पहावयास मिळतात. आणि त्यामुळेच हा परिसर महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांना देखील खुणावत असतो.
भंडारदरा धरणाच्या शतकपूर्ती निमित्त एक भव्य कार्यक्रम करण्याचा आमदार सत्यजीत तांबे यांचा मानस आहे. त्या निमित्त परिसरात भारतातील पहिले “वॉटर म्युझियम” उभारण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस यांनाही ही संकल्पना आवडली असून त्यांनी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.